Euro 2024: रोनाल्डोच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह! एकाच सामन्यात 4 प्रेक्षकांची सेल्फीसाठी थेट मैदानात धाव, Video व्हायरल

Cristiano Ronaldo: रोनाल्डोबरोबर सेल्फीसाठी युरो स्पर्धेतील पोर्तुगालच्या एकाच सामन्यात 4 प्रेक्षकांनी सुरक्षा तोडत मैदानात घुसल्याची माहिती समोर आली आहे.
Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoSakal
Updated on

Cristiano Ronaldo: पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा लोकप्रिय खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर फोटो काढण्याची संधी साधण्यासाठी चाहते वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात, अनेकदा काही चाहते मोठी जोखीमही स्विकारतात. याचाच प्रत्येय सध्या सुरू असलेल्या युरो स्पर्धेत आला आहे.

शनिवारी (२२ जून) पोर्तुगाल आणि तुर्कस्थान या संघात सामना पार पडला. या सामन्यात पोर्तुगालने ३-० गोल फरकाने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात तीन वेळा प्रेक्षकांनी सुरक्षा तोडली.

Cristiano Ronaldo
Euro 2024: स्पेनचा विजयासह अंतिम-16 मध्ये प्रवेश, इटलीला रिकार्डोच्या ओन गोलचा बसला फटका

पहिल्यांदा सामन्याच्या ६९ व्या मिनिटाला एका छोट्या चाहत्याने मैदानात धाव घेतली. त्याने रोनाल्डोजवळ जात त्याच्याबरोबर सेल्फी काढली. पण त्यानंतर त्याला सुरक्षारक्षकांनी मैदानातून बाहेर नेले, यानंतर अखेरची काही मिनिटे राहिलेली असताना आणखी दोन जणं मैदानात खुसले आणि रोनाल्डोबरोबर सेल्फीचा प्रयत्न केला.

यानंतर पुन्हा सामन्याच्या अगदी अखेरीस आणखी एका व्यक्तीने मैदानाची सुरक्षा तोडली आणि रोनाल्डोजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तसेच आणखी दोन जणांना सुरक्षा तोडण्यापासून सुरक्षारक्षकांनी अडवले होते. त्यामुळे आता रोनाल्डोच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Cristiano Ronaldo
Euro Cup 2024 : सर्बियाने का दिली युरो कपमधून बाहेर पडण्याची धमकी; मैदानावर नेमकं काय घडलं?

प्रशिक्षक मार्टिनेजने याबद्दल म्हटले की ही काळजीची गोष्ट आहे. आज आम्ही लकी होतो कारण चाहत्यांचा हेतू चांगला होता.' त्याचबरोबर पोर्तुगालचा खेळाडू बर्नांडो सिल्वा म्हणाला, 'यामुळे सामना थांबवावा लागत असण्याचे हे वैताग आणणारे होते.'

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बर्नार्डो सिल्वाने २१ व्या मिनिटाला पोर्तुगालसाठी गोल केला. तर तुर्कस्तानच्या समेत अकायदिनने स्वयंगोल केला.

तसेच ५६ व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडिसने पोर्तुगालसाठी तिसरा गोल नोंदवला. त्यामुळे पोर्तुगालने या सामन्यात सहज विजय मिळवण्याबरोबरच अंतिम १६ संघांमध्ये स्थान मिळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()