Euro Cup 2024 : किलियन एम्बाप्पेची अनुपस्थिती; नेदरलँड्सने फ्रान्सला बरोबरीत रोखले

Euro Cup 2024 France : फ्रान्सला आज कर्णधार एम्बाप्पेच्या अनुपस्थितीचा मोठा फटका बसला. नेदरलँड्सने सामना गोल शुन्य बरोबरीत संपवला.
France Vs Netherlands
Euro Cup 2024 France Vs Netherlandsesakal

Euro Cup 2024 France Vs Netherlands : युरो कप 2024 मध्ये फ्रान्स आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना हा गोल शुन्य बरोबरीत सुटला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पेला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात खेळला नव्हता.

किलियन एम्बाप्पेचे नाव राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र तो आजच्या सामन्यात मैदानात उतरला नाही. नेदरलँड्सने याचा फायदा उचलत सामना गोलं शुन्य बरोबरीत रोखला. फ्रान्सने आपला गेला ऑस्ट्रियाविरूद्धचा सामना 1 - 0 ने जिंकला होता. त्या सामन्यात एम्बाप्पेच्या नाकाला दुखापत झाली होती.

France Vs Netherlands
IND vs BAN T20 WC 2024 Live : टीम इंडियाला प्रयोग करण्याची संधी मात्र सामना जिंकणंही महत्वाचं

दुखापतग्रस्त किलियन एम्बाप्पेने नेदरलँड्स सामन्यापूर्वी मास्क घालून सराव केला होता. फ्रान्सचे कोच डिडिएर डेसचॅम्प्स यांना एम्बाप्पे हा नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात खेळेल अशी आशा होती.

मात्र फ्रान्सने नेदरलँड्सच्या संघातील धिप्पाड शरिरयष्टी असलेल्या बचावपटूंविरूद्ध एम्बाप्पेला मैदानात उतरवण्याची जोखीम घेतली नाही. एम्बाप्पे ज्यावेळी टीम बसमधून खाली उतरला त्यावेळी तो उत्साही वाटत होता. त्याच्या नाकावर कोणतीही पट्टी नव्हती.

France Vs Netherlands
MS Dhoni: धोनीच्या साधेपणाची चर्चा! मित्राचा वाढदिवस त्याच्या घरी जाऊन केला साजरा, Video Viral

सामन्यावर फ्रान्सचं वर्चस्व मात्र...

नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात फ्रान्स पूर्णवेळ आपला दबदबा राखला होता. फ्रान्सने नेदरलँड्सच्या गोलपोस्टवर 15 शॉट मारले. मात्र त्यातील फक्त 3 शॉट्सच ऑन टार्गेट होते. दुसरीकडे नेदरलँड्सच्या खेळाडूंनी 8 शॉट्स मारले होते.

सामन्यात चेंडूवर ताबा मिळवण्यात देखील फ्रान्स आघाडीवर होता. त्यांनी एकूण वेळेच्या 63 टक्के वेळ चेंडूवर ताबा मिळवाला. मात्र फ्रान्सला संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही. त्यामुळे त्यांना सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले.

फ्रान्स आणि नेदरलँड्स यांचे आता समान चार चार गुण झाले आहेत. ऑस्ट्रिया 3 गुणांवर आहे. त्यांनी ग्रुपमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात पोलंडचा 3 -1 ने पराभव केला. पोलंडने दोन सामन्यात एकही गुण मिळवलेला नाही. त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. जरी त्यांनी फ्रान्सविरूद्धचा सामना जिंकला तरी ते पुढच्या फेरीत जाऊ शकणार नाहीयेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com