Cameron Green : ऑस्ट्रेलियाचा इंग्लिस आऊट; भारताविरूद्ध 200 चा स्ट्राईक असलेल्या ग्रीनची वर्णी

Cameron Green Will Replace Injured Josh Inglis in Australia T20 squad
Cameron Green Will Replace Injured Josh Inglis in Australia T20 squad esakal
Updated on

Cameron Green Will Replace Injured Josh Inglis : ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी 20 वर्ल्डकपला 'जागतिक' दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. दर दोन दिवसाला एक खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडत आहे. आता ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर फलंदाज जॉश इंग्लिस विचित्र पद्धतीने गोल्फ खेळताना दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला दुखापत झाली असून तो वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आता अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला ऑस्ट्रेलियाने संघात स्थान दिले आहे. आयसीसी टी 20 वर्ल्डकप तांत्रिक समितीने ग्रीनला संघात बदली खेळाडू म्हणून घेण्यास परवानगी दिली आहे.

Cameron Green Will Replace Injured Josh Inglis in Australia T20 squad
Roger Binny : मयंती लँगरने सासरेबुवा BCCI अध्यक्ष होताच दिली प्रतिक्रिया, ट्विट करत..

कॅमेरून ग्रीनने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून 7 टी 20 सामने खेळले आहेत. 23 वर्षाचा ग्रीन भारतात झालेल्या भारताविरूद्धच्या मालिकेत आणि न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत खेळला होता. त्याने भारतातील टी 20 मालिकेत दोन अर्धशतकी खेळी करत जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 7 टी 20 सामन्यात 136 धावा केल्या असून पाच विकेट्स देखील घेतल्या आहेत. तो मध्यमगती गोलंदाज आहे.

दरम्यान, इग्निसला कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. मात्र त्याच्या तळहातावर कट पडले आहेत. त्यामुळे त्याला टी 20 वर्ल्डकपला मुकावे लागले. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड याबाबत म्हणाले की, 'जॉशला मोठी दुखापत झाली आहे. ही संघासाठी चांगली गोष्ट नाही. आता आम्हाला बॅक अप विकेटकिपर आणि बॅक अप बॅट्समनसाठी नव्याने काम करावे लागणार आहे.'

Cameron Green Will Replace Injured Josh Inglis in Australia T20 squad
Non Strike Run Out : रवी शास्त्री म्हणतात, नियम म्हणजे नियम.. करा बिनधास्त!

मॅकडोनाल्ड पुढे म्हणाले की, 'जॉशच्या उजव्या तळहाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बॅट ग्रीप करू शकत नाही तसेच विकेट किपिंग करताना चेंडू सातत्याने त्याच्या जखमेवर आदळत राहील. ही चांगली स्थिती नाही.' ऑस्ट्रेलिया शनिवारी टी 20 वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना न्यूझीलंडविरूद्ध खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.