Faf Du Plessis : फाफ निवृत्तीतून बाहेर येणार; आयपीएल 2024 च्या हंगामात आरसीबीला शोधावा लागणार नवा कर्णधार?

Faf Du Plessis
Faf Du Plessisesakal
Updated on

Faf Du Plessis : दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने निवृत्तीतून बाहेर येण्याचे संकेत दिले आहेत. पुढच्या वर्षी वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपपूर्वी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता आहे. ड्युप्लेसिस म्हणाला की, दक्षिण अफ्रिकेचे मर्यादित षटकातील संघाचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर आणि फाफ ड्युप्लेसिस हे एकमेकांच्या संपर्कात आहेत.

Faf Du Plessis
Ravi Bishnoi ICC T20 Ranking : टी 20 रँकिंगमध्ये मोठा धमाका; रवी बिश्नोईने राशिद खानचे सिंहासन हिसकावले

फाफ ड्युप्लेसिसने शेवटाचा आंतरराष्ट्रीय टी 20 सामना हा 2020 मध्ये खेळला होता तर दक्षिण अफ्रिकेकडून ड्युप्लेसिस शेवटचा सामना हा फेब्रुवारी 2021ला पाकिस्तानात खेळला होता.

फाफ ड्युप्लेसिसने अबुधावी टी 10 लीगमध्ये बोलताना सांगितले की, 'मला असं वाटतं की मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतू शकतो. आम्ही याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा करतोय. मी नव्या कोचसोबत याबाबत बोललो आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी संघाचा समतोल कसा आहे हे पहावे लागेल.'

Faf Du Plessis
Rohit Sharma T20 World Cup : तुमचं काय ते आताच सांगा... रोहितने टी 20 वर्ल्डकपबाबत बीसीसीआयला स्पष्टच सांगितलं

फाफ ड्युप्लेसिस हा जगभरातील आंतरराष्ट्रीय टी 20 लीगमध्ये दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेसाठी ही चांगली बातमी असली तरी आरसीबीसाठी ही चिंता वाढवणरी गोष्ट ठरू शकते.

कारण तो जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आणि टी 20 वर्ल्डकप खेळण्याची निर्णय घेतला तर तो आयपीएलचे काही सामने न खेळण्याचा देखील निर्णय घेऊ शकतो. तो आरसीबीचा कर्णधार असल्याने आरसीबीला काही सामन्यांसाठी का असेना त्यांना दुसरा कर्णधार शोधावा लागण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.