SAFF चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर २६ हजार प्रेक्षकांनी गायलं वंदे मातरम्! रोमांचक Video Viral

अंतिम सामन्यात कुवैतवर मात करत हा ऐतिहासिक विजय भारताने मिळवला.
SAFF Viral Video
SAFF Viral VideoeSakal
Updated on

भारतीय फुटबॉल संघाने चमकदार कामगिरी करत SAFF चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं. अंतिम सामन्यात कुवैतवर मात करत हा ऐतिहासिक विजय भारताने मिळवला. या सामन्यात विजय मिळाल्यानंतर काही क्षणातच स्टेडियममधील प्रेक्षकांनी 'माँ तुझे सलाम' आणि 'वंदे मातरम्' गायलं. या रोमांचक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बंगळुरूच्या श्री कांतीरावा स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. याठिकाणी तब्बल २६ हजार प्रेक्षक उपस्थित होते. या सर्वांनी एकत्रितपणे वंदे मातरम् गायलं. हा क्षण खरोखरच अंगावर रोमांच उभे करणारा होता. लाखो भारतीय हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आंतरखंडीय स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाने मंगळवारी कुवेत संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ अशी मात केली आणि सॅफ या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. भारताचे हे या स्पर्धेचे नववे जेतेपद ठरले हे विशेष.

असा झाला सामना

भारत-कुवेत यांच्यामधील अंतिम लढतीची सुरुवात दमदार झाली. १४ व्या मिनिटाला शबीब अल खाल्दी याने कुवेतसाठी पहिला गोल केला. पूर्वार्धात कुवेत ही आघाडी कायम ठेवणार असे वाटत असतानाच ३८ व्या मिनिटाला भारताकडून एल. छांगटे याने एक गोल केला.

SAFF Viral Video
Ind vs Pak Football Match : फुटबॉल सामन्यादरम्यान भारत-पाकच्या खेळांडूमध्ये धक्काबुक्की; अन्यायकारक निर्णय सहन न करण्याचा निर्धार

उत्तरार्धात दोन्ही देशांकडून गोल करण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र कुणालाही गोल करता आला नाही. वेळ संपताना दोन देशांमध्ये १-१ अशी बरोबरी कायम राहिली. त्यामुळे एक्स्ट्रा टाईम घेण्यात आला. मात्र यातही बरोबरी कायम राहिली. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये या लढतीचा निकाल भारताच्या बाजूने लागला.

भारत-कुवेत यांच्यामध्ये पेनल्टी शूटआऊटचा थरार रंगला. सुनील छेत्रीने भारताकडून पहिला गोल केला. त्यानंतर संदेश झिंगन, एल. छांगटे, सुभाशिष बोस व महेश सिंग यांनी कुवेतच्या गोलरक्षकाचा बचाव भेदला आणि भारताला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. भारताकडून उदांता सिंग याला गोल करता आला नाही. भारताचा गोलरक्षक गुलप्रीत सिंग संधू याने पेनल्टी शूटआऊटमध्ये अप्रतिम कामगिरी केली.

SAFF Viral Video
SAFF Championship 2023 : भारताची SAFF चॅम्पियनशिप विजेतेपदाला गवसणी, रोमांचक लढतीत कुवेतचा पराभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.