अशी कामगिरी करणारा फवाद आलम आशियातला पहिला फलंदाज ठरला
Pak vs WI Test Series: पाकिस्तानचा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना विंडिजने जिंकल्यामुळे दुसरा सामना जिंकणे पाकिस्तानसाठी अपरिहार्य आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात आतापर्यंत तीन दिवसांचा खेळ झाला असून त्यात पाकिस्तानने पहिल्या डावात ९ बाद ३०२ धावा केल्या, तर विंडिजने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३९ धावांत ३ गडी गमावले. सामन्यात पाकिस्तानचा फवाद आलम याने धडाकेबाज शतक झळकावलं. विशेष बाब म्हणजे, या शतकासोबत त्याने आशिया खंडातील सर्व दिग्गज फलंदाजांना मागे टाकलं.
३५ वर्षीय आलमने जमैकाच्या सबैना पार्क मैदानात शानदाक शतक झळकावलं. त्याने १७ चौकारांसह २१३ चेंडूत नाबाद १२४ धावांची खेळी केली. गेल्या ८ महिन्यातील हे त्याचं चौथं शतक ठरलं. आशिया खंडातील क्रिकेटपटूंच्या यादीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच शतके ठोकण्याचा विक्रम फवाद आलमने केला. त्याने १३ सामन्यात ५ कसोटी शतके झळकावली. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यासारख्या दिग्गज कसोटीपटूंना त्याने मागे टाकलं.
फवाद आलम - २२ डाव
चेतेश्वर पुजारा - २४ डाव
सौरव गांगुली - २५ डाव
सुनील गावसकर - २५ डाव
विजय हजारे - २६ डाव
आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, त्याने पाचही शतके वेगवेगळ्या प्रतिस्पर्धी संघाविरोधात झळकवण्याचाही पराक्रम केला. इतकेच नव्हे तर पाच वेगळ्या स्टेडियममध्ये त्याने ही शतके साजरी केली. त्याने पुढील ठिकाणी शतके ठोकली.
पाक वि. श्रीलंका - कोलंबो
पाक वि. न्यूझीलंड - माऊंट माऊंगनुई
पाक वि. दक्षिण आफ्रिका - कराची
पाक वि. झिम्बाव्बे - हरारे
पाक वि. विंडिज - किंगस्टन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.