Size Matter: मर्यादेपेक्षा जास्त लांबीच्या बॅटने फलंदाजी केली अन् संघाचे १२ गुण कापले गेले

Feroze Khushi used oversized bat: फिरोझ खुशीने सामन्यात जास्त आकाराची बॅट वापरल्याने एसेक्स क्लबचे १२ गुण वजा करण्यात आले आहेत.
Feroze Khushi
Feroze Khushiesakal
Updated on

Feroze Khushi oversized bat : काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेत फलंदाजाने जास्त आकाराची बॅट वापरल्याने चक्क संघाला भूर्दंड बसला. क्रिकेट शिस्तपालन समितीने (CDC) एसेक्स क्लबचे १२ गुण कमी केले आणि त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याचे झाले असे की, एसेक्सचा खेळाडू फिरोझ खुशीने सलामीच्या सामन्यात जास्त आकाराची बॅट वापरल्याचे आढळून आले. त्यामुळे क्लबचे १२ गुण कमी करण्याचा निर्णय घेतला गेला.

६ एप्रिल रोजी नॉटिंगहॅमशायर विरुद्ध एसेक्सच्या दुसऱ्या डावात हा प्रकार उघडकीस आला. ऑनफिल्ड पंच टॉम लुंगले आणि स्टीव्ह ओ'शॉघनेसी यांना २१ धावा करणाऱ्या खुशीची बॅट जास्त आकाराची दिसून आली. एसेक्सने हा सामना २५४ धावांनी जिंकला, परंतु आता त्यांनी त्या सामन्यातून घेतलेल्या २० गुणांपैकी १२ गुण गमवावे लागले आहेत. याचा अर्थ ते सरेपेक्षा ५६ गुणांनी पिछाडीवर आहेत.

Feroze Khushi
Ruturaj Gaikwad ने मैदान गाजवलं! पाय मुरगळला, रिटायर्ड हर्ट झाला अन् ६ तासांनी पुन्हा फलंदाजीला आला

शिस्तपालन समितीच्या सांगण्यावरून कायद्यानुसार बॅटची रुंदी १०.०८ सेमी असावी, परंतु खुशीच्या बॅट रुंदीमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. फलंदाजाने त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, त्याने बॅट तयार करणाऱ्या निर्मात्याने एमसीसीच्या नियमांनुसार ती बनवली होती. मोठी बॅट वापरण्याचा माझा हेतू नव्हता,परंतु या प्रकरणात त्याचे मत विचारात घेण्यात आले नाही.

एसेक्सने निकालाबद्दल दुःख व्यक्त केले. तपासादरम्यान वापरल्या जाणाऱ्या बॅट गेजबद्दल स्पष्टीकरण मिळविण्यासाठी CDC, क्रिकेट नियामक व इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांना पत्र लिहिणार आहे.

सामन्यामध्ये एसेक्सने पहिल्या डावात २५३ धावसंख्या उभारली. सामन्यादरम्यान डीन एल्गारने ८० धावांची खेळी केली तर जॉर्डन कॉक्स ने ८४ धावांची खेळी केली. नॉटिंहॅमशायर चा गोलंदाज डेन पॅटरसनने या डावात ५ विकेट्स घेतले.

Feroze Khushi
Ishan Kishan Century : १४ चौकार, ३ षटकार! इशान किशनने गाजवली मॅच, टीम इंडियात येण्यासाठी लावला जोर

नॉटिंहॅमशायरने त्यांच्या पहिल्या डावात २९३ धावसंख्या उभारली. दरम्यान जो क्लार्कने १०४ धावांची शतकिय खेळी केली. एसेक्सने दुसऱ्या डावामध्ये धमाकेदार फलंदाजी करत ३७४ धावसंख्या उभारून नॉटिंहॅमशायर संघाला ३३५ धावांचे आव्हान दिले. परंतु एसेक्स च्या गोलंदाजांनी नॉटिंहॅमशायर ची खेळी ८० धावांवर आटपली व २४५ धावांनी नॉटिंहॅमशायरला पराभूत केले.

फिरोझ खुशीला जरी सामन्यामध्ये जास्त धावा बनवता आल्या नसल्या तरी नियमाचे उलंघन केल्याने एसेक्सवर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.