D Gukesh vs Ding Liren: जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढत सध्या सिंगापूरमध्ये सुरू आहे. या लढतील सर्वाय युवा स्पर्धक ठरलेला भारताच्या डी गुकेशसमोर चीनच्या डिंग लिरेनचे आव्हान आहे.
१४ फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा रंगत असून पहिल्या फेरीत डिंग लिरेनने गुकेशला पराभवाचा धक्का दिला होता. पण दुसऱ्या फेरीत गुकेशने पुनरागमन केले. दुसरी फेरी ड्रॉ राखण्यात गुकेशने यश मिळवले आहे.
मंगळवारी (२६ नोव्हेंबर) दुसरी फेरी पार पडली. या फेरीत तीनवेळा एकच स्थिती तयार होत असल्याने सामना ड्रॉ करण्याचा निर्णय झाला. नियमानुसार जर लढतीत एकच स्थिती तीनवेळा आली, तर सामना ड्रॉ केला जाऊ शकतो.