FIFA World Cup Qatar :बीअर बॅन! कतारच्या कोलांटी उडीने फॅन्स अन् कंपन्यांना मोठा धक्का

FIFA and Qatar on Friday banned beer sales around the eight World Cup 2022 stadiums
FIFA and Qatar on Friday banned beer sales around the eight World Cup 2022 stadiums esakal
Updated on

FIFA World Cup Qatar Beer Banned : फिफा आणि कतारने वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी 48 तास आधीच आपली बीअरबाबतची भुमिका बदलत स्टेडियममध्ये बीअरवर संपूर्णपणे बंदी आणली आहे. यामुळे फुटबॉल चाहत्यांना तसेच बीअर विक्री करणाऱ्या कंपन्यांना चांगलाच धक्का बसला आहे. फिफा वर्ल्डकप पाहण्यासाठी येणाऱ्या फुटबॉल चाहत्यांमध्ये बीअर फार प्रसिद्ध असते. विशेषकरून युरोपातील चाहते बीअरसोबतच फुटबॉलचा आनंद घेत असतात. मात्र कतार हे मुस्लीम राष्ट्र असल्याने या देशात मद्यपानावर बंदी आहे. त्यामुळे कतारने हा निर्णय घेतला.

FIFA and Qatar on Friday banned beer sales around the eight World Cup 2022 stadiums
FIFA World Cup 2022 VIDEO : पोलंडच्या फुटबॉल संघासाठी खास एफ - 16 लढाऊ विमान केलं तैनात

फिफाने आपल्या आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले होते की मद्य हे फक्त फॅन झोनमध्ये मिळेल. कतारमधील फिफा वर्ल्डकप होणाऱ्या स्टेडियमवरील आवारातून बीअर विक्री केंद्रे हटवण्यात आली आहेत.' दरम्यान, कतार आणि इक्वाडोर सामन्यासाठी स्टेडियमवर अनेक बीअर टेंट उभारण्यात आले होते.

FIFA and Qatar on Friday banned beer sales around the eight World Cup 2022 stadiums
Cristiano Ronaldo : रोनाल्डो निवृत्ती घेणार; मुलाखतीत मेस्सीबद्दल काय म्हणाला?

फिफा वर्ल्डकप पाहण्यासाठी कतारमध्ये जवळपास 10 लाख विदेशी चाहते येतील असा अंदात आहे. जगातील सर्वात मोठा इव्हेंट फिफा वर्ल्डकप हा 29 दिवस चालणार आहे. बीअर उत्पादन करणारी कंपनी बडवाईजर आणि फिफाची आधीपासूनच भागीदारी आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार व्हीआयपी सुटमध्ये बीअर मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.