नवी दिल्ली : जागतिक फुटबॉल संघटना अर्थात फिफाने युरो आणि कोपा अमेरिका स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर जाहीर केलेल्या क्रमवारीत विश्व आणि कोपा स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकणाऱ्या अर्जेंटिनाने अव्वल स्थान कायम राखले. याचवेळी भारतीय संघही १२४ या क्रमांकावर कायम राहिला.
जून महिन्यातही अशीच क्रमवारी जाहीर करण्यात आली होती, त्यात भारतीय संघाची तीन गुणांनी पिछेहाट होऊन १२४वे स्थान मिळाले होते. २०२६ मधील विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरला नव्हता. कतार आणि अफगाणिस्तानकडून पराभव झाल्याचा परिणाम भारताच्या क्रमवारीवर झाला होता.
गेल्या डिसेंबरपासून भारताच्या क्रमवारीत सातत्याने घसरण होत आहे. गेल्यावर्षी भारतीय संघाने टॉप १०० मध्ये स्थान मिळवले होते. ९९ ही सर्वोत्तम क्रमवारी होती, मात्र त्यानंतर सुधारणा करण्याऐवजी घसरणच झाली. आशिया खंडात भारताचे स्थान २२वे आहे. लेबनन, पॅलेस्टिन आणि व्हिएतनामनंतर भारताची क्रमवारी आहे.
अव्वल स्थानावर अर्जेंटिना कायम राहणे अपेक्षित होते. विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर त्यांनी आता कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. त्यांच्यानंतर फ्रान्स दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. युरो करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यामुळे स्पेनने पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर अंतिम सामन्यात स्पेनकडून पराभव झालेल्या इंग्लंडने एका क्रमांकाची प्रगती केली ते चौथ्या स्थानावर आले आहेत.
कोपा अमेरिका स्पर्धेत उपांत्य फेरी न गाठू शकलेल्या ब्राझीलची एका गुणाने पिछेहाट झाली ते पाचव्या क्रमांकावर आहेत. बेल्जियमची तर तीन गुणांनी घसरण झाली ते नवव्या स्थानावर पोहोचले आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डोचीही अशीच स्थिती झाली आहे. आठव्या क्रमांकावर त्यांची घसरण झाली.
१) अर्जेंटिना (१९०१.४८), २) फ्रान्स (१८५४.९१), ३) स्पेन (१८३५.६७), ४) इंग्लंड (१८१२.२६), ५) ब्राझील (१७८५.६१), ६) बेल्जियम (१७७२.४४), ७) नेदरलँडस् (१७५८.५१), ८) पोर्तुगाल (१७४१.४३), ९) कोलंबिया (१७२७.३२), १०) इटली (१७१४.२९)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.