FIFA World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाने एकच गोल केला अन् इतिहासात नाव कोरले

FIFA World Cup 2022 Australia Defeat Tunisia
FIFA World Cup 2022 Australia Defeat Tunisia esakal
Updated on

नंFIFA World Cup 2022 Australia Defeat Tunisia : फिफा वर्ल्डकपमध्ये आज (दि.26) ग्रुप D ऑस्ट्रेलिया आणि ट्युनिशिया यांच्यात सामना झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 1 - 0 असा जिंकत यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिला विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ड्युकने पहिल्याच हाफमध्ये 23 व्या मिनिटाला गोल केला. विशेष म्हणजे या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमध्ये तीन वेगवेगळ्या खंडातील संघांना पराभूत करणारी तिसरी टीम ठरली आहे.

त्यांनी आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातील संघांचा वेगवेगळ्या वर्ल्डकपमध्ये पराभव केला. यापूर्वी अशी कामगिरी इराण आणि अल्जेरियाने केली होती. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने 1974 नंतर पहिल्यांंदाच वर्ल्डकप सामन्यात गोल खाल्ला नाही. ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपमधील आपला 12 वर्षाचा दुष्काळ संपवून विजय मिळवला.

FIFA World Cup 2022 Australia Defeat Tunisia
Jasprit Bumrah : हे सोपं नसतं.... म्हणत जसप्रीत बुमराहने VIDEO केला शेअर

पहिल्या हाफमध्ये ऑस्ट्रेलिया आणि ट्युनिशिया यांच्यात बॉलवर ताबा मिळवण्यासाठी चुरस पहायला मिळाली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या ड्युकने 23 व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल केला आणि संघाचे गोलचे खाते उघडले. पहिल्याच हाफच्या सुरूवातीलाच ट्युनिशियाने गोल खाल्याने त्यांनी या गोलंची परतफेड करण्यासाठी जोरदार खेळ करण्यास सुरूवात केली. ट्युनिशियाने ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर चढाई करण्यास सुरूवात केली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बचाव फळीने आपल्या गोलपोस्टचा चांगला बचाव केला.

FIFA World Cup 2022 Australia Defeat Tunisia
Shoaib Akhtar : अख्तरने भारत - पाक सामन्यानंतर महिन्याभरात MCG ची झालेली अवस्था पाहून केले ट्विट

यानंतर दुसऱ्या हाफमध्ये देखील ट्युनिशियाने पासिंग आणि बॉल पजेशनच्या बाबतीत ऑस्ट्रेलियापेक्षा सरस खेळ केला. याचबरोबर ट्युनिशियाने सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर 14 वेळा हल्ला चढवला. मात्र त्यातील फक्त 4 शॉट्सच अचूक होते. याउलट ऑस्ट्रेलियाने 9 शॉट्सपैकी 2 शॉट्सच अचूक मारले. त्यातील एक गोलमध्ये रुपांतरित झाला. पहिल्याच हाफमध्ये गोल झाल्यानंतर ट्युनिशियाने गोलची परतफेड करण्यासाठी आक्रमक खेळ करतानाचा धसमुसळा खेळ देखील केला. त्यामुळे त्यांना सामन्यात तीन यलो कार्ड मिळाले.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()