Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo sakal

fifa world cup 2022 : ख्रिस्तियानो रोनाल्डो संघासोबतच असेल

स्पर्धा मध्येच सोडून जाण्याच्या वृत्ताचे पोर्तुगाल फुटबॉल संघटनेकडून खंडन
Published on

लिस्बन : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आता दुय्यम स्थान मिळाल्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगाल संघातून मध्येच बाहेर पडण्याची धमकी दिल्याच्या वृत्ताचे पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने खंडन केले आहे.

स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोला सुरुवातीपासून खेळवण्यात आले नाही, त्यामुळे तो प्रचंड नाराज असून त्याने स्पर्धा मध्येच सोडून जाण्याची धमकी दिल्याचे वृत्त पोर्तुगालमधील काही प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. याच स्पर्धेत अगोदरच्या कोरियाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोला काही वेळानंतर राखीव खेळाडू करण्यात आले, त्यावर त्याने तीव्र राग व्यक्त केल्याचेही सांगण्यात येत आहे.पोर्तुगाल फुटबॉल संघटनेने मात्र या सर्व अफवा असल्याचे सांगत रोनाल्डो संघासोबतच राहाणार असल्याचे स्पष्ट केले.

अडचणीच्या मार्गावर रोनाल्डो

रोनाल्डो सध्या अडचणीच्या मार्गावरून जात आहे. विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्याअगोदर त्याने मँचेस्टर युनायटेड क्लबच्या प्रशिक्षकांवर तोफ डागली. या क्लबबरोबर असलेला करार मध्यावरच थांबवला. तेथेही त्याला खेळण्याची संधी दिली जात नव्हती. बहुतेक वेळा राखीव खेळाडूत ठेऊन अखेरच्या काही मिनिटांसाठी त्याला मैदानात आणले जात होते.

तो निर्णय रोनाल्डोला सांगूनच

विश्वकरंडक स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व सामन्यात रोनाल्डोला राखीव ठेवण्याचा निर्णय त्याला सांगून घेण्यात आला होता, असे प्रशिक्षक संॅतोस यांनी सांगितले. मात्र अगोदरच्या सामन्यातील हा निर्णय त्याला पटला नव्हता, असेही ते म्हणाले. यावरून रोनाल्डो आणि पोर्तुगाल संघ व्यवस्थापन यांच्यात अलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

स्वित्झर्लंडविरुद्धच्या लढतीत रोनाल्डोऐवजी संधी देण्यात आलेल्या गोन्सालो रामोस याने हॅट्ट्रिक् करून आपली गुणवत्ता दाखवून दिली, त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यात रामोसला प्राधान्य मिळणार हे निश्चित आहे, परिणामी रोनाल्डोला पुन्हा राखीव खेळाडूतच राहावे लागायची शक्यता आहे.

विक्रमी रोनाल्डो

रोनाल्डो पोर्तुगालकडून सर्वाधिक (१९५) सामने खेळलेला खेळाडू आहे. यात त्याने सर्वधिक (११८) गोल केलेले आहेत. रोनाल्डोने संघासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याबद्दलचा आदर आमच्याकडे कायम आहे, असेही पोर्तुगाल फुटबॉल संघटनेने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()