FIFA WC22: एमबाप्पेचा गोलवर ट्विटचा विक्रम! दर सेकंदाला पडत होते इतकी हजार ट्विट

फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एक नवा विश्वचषक विक्रम
Lionel Messi vs Kylian Mbappe
Lionel Messi vs Kylian Mbappesakal
Updated on

FIFA World Cup 2022 Final Argentina vs France: अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा किलियन एमबाप्पे यांनी फिफा विश्वचषक 2022च्या अंतिम फेरीत अनेक विक्रम केले. या सामन्यात मेस्सीने दोन गोल केले. त्याचवेळी एमबाप्पेनेही तीन गोल करत गोल्डन बूट जिंकला. या सामन्याच्या पूर्वार्धात अर्जेंटिनाने दोन गोल करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते, मात्र दुसऱ्या हाफमध्ये एम्बाप्पेने सलग दोन गोल नोंदवून आपल्या संघासाठी जबरदस्त पुनरागमन केले. या दोन गोलच्या जोरावर त्याने केवळ वैयक्तिक विक्रमच केला नाही तर ट्विटरवर एक खास विक्रमही केला.

Lionel Messi vs Kylian Mbappe
Lionel Messi Argentina : अखेर मेस्सीच्या हाताचा ठसा 'वर्ल्डकप'वर उमटला; अर्जेंटिना 36 वर्षाने झाला विश्वविजेता!

एमबाप्पेच्या गोलवर प्रत्येक सेकंदाला 24,400 ट्विट होते. ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. एका सेकंदात कोणत्याही विश्वचषकावर यापेक्षा जास्त ट्विट झालेले नाहीत. प्रति सेकंद जास्तीत जास्त ट्विट करण्याचा हा नवा विक्रम आहे. याआधी क्रिकेटच्या टी-20 विश्वचषक आणि इतर खेळांच्या विश्वचषकावरही बरेच ट्विट झाले आहेत, मात्र फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एक नवा विश्वचषक विक्रम प्रस्थापित झाला आहे.

Lionel Messi vs Kylian Mbappe
Argentina Penalty Shoot out : पेनाल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाच बाप! फायनलमध्ये रचला विश्वविक्रम

याआधी ट्विटरवर एका सेकंदात जास्तीत जास्त ट्विट करण्याचा विक्रम जपानच्या अॅनिमी चाहत्यांनी केला होता. 2013 मध्ये अॅनिम शो कॅसल इन द स्कायच्या प्रसारणादरम्यान, अॅनिम चाहत्यांनी प्रत्येक सेकंदाला 143,199 ट्विट केले आणि जागतिक विक्रम केला.

या सामन्यात फ्रान्ससाठी एम्बाप्पेने तीनही गोल केले, तर अर्जेंटिनासाठी मेस्सीने दोन आणि अँजेल डी मारियाने एक गोल केला. सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला. अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. अर्जेंटिनाने चार गोल केले. त्याच वेळी फ्रान्सने गोलचे चार प्रयत्न केले आणि केवळ दोनमध्ये गोल करण्यात यश आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()