FIFA World Cup 2022 Qatar Fire Broke Out In Fan City : कतारमधील लुसैल शहरातील वर्ल्डकप सिटीमध्ये भीषण आग लागल्याचे वृत्त द सन या वेबसाईटने दिले आहे. मिळालेल्या फुटेजनुसार क्वेटैफन आईसलँड नॉर्थ येथील चाहत्यांच्या व्हिलेजमधून उठणारे काळ्या धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या व्हिलेजमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या एका इमारतीमध्ये आग लागली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सिव्हिल डिफेन्सने हा आग नियंत्रणात आणली असून कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त अजून तरी मिळालेले नाही.
कतारने फिफा वर्ल्डकप यशस्वी करण्यासाठी पायाभूत सोयी आणि सुविधांवर लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. तरी देखील आगीसारखी घटना घडली. कतारच्या गृह मंत्रालयाने सांगितले की लुसैलच्या आईसलँडमधील या भागात संध्याकाळी आग लागली. या शहरातच फिफाचे अनेक सामने होणार आहेत. यात शनिवारी रात्री होणाऱ्या अर्जेंटिना विरूद्ध मॅक्सिको या हाय व्होल्टेज सामन्याचा देखील समावेश आहे.
ही आग लुसैल स्टेडियमपासून 3.5 किलोमीटर अंतरावर लागली. आग लागल्यानंतर आकाशात काळ्या धुराचे लोट उठरले होते. हे धुराचे लोट सेंट्रल दोहाच्या मार्केटप्लेसमधून आणि वर्ल्डकप फॅन स्पॉटपासून स्पष्टपणे दिसत होते.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.