FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनानंतर आता जर्मनीचाही पराभव

अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया यांच्या सामन्यातही असेच चित्र
fifa world cup 2022 japan stun germany in dramatic comeback with 2 1 win football sport doha
fifa world cup 2022 japan stun germany in dramatic comeback with 2 1 win football sport dohasakal
Updated on

दोहा : माजी विजेत्या अर्जेंटिनाच्या पराभवाच्या धक्यातून फुटबॉल विश्व सावरत नाही तोच आज आणखी एक धक्का बसला. अर्जेंटिनाप्रमाणे विश्वकरंडक जिंकणाऱ्या जर्मनीचा सलामीलाच पराभव झाला. जपानने २-१ अशा विजय मिळवून विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक निकालाची नोंद केली.

जर्मनी या नावात दरारा असला तरी पूर्वी इतका त्यांचा संघ प्रबळ राहिलेला नाही. मात्र त्यामुळे जपानच्या खेळाचे महत्व कमी होत नाही. एका गोलची पिछाडी असताना त्यांनी मिळवलेला विजय खेळाडूंप्रमाणे त्यांच्या प्रशिक्षकांच्याही हुशारीचे फलीत मानले जात आहे. जपानचे प्रशिक्षक हाजिमे मोरियासू यांनी उत्तरार्धात बदल केले. राखीव खेळाडू मैदानात आणले आणि त्यांनीच गोल करून सर्वाना थक्क केले. सामन्याच्या ९० मिनिटांत ७४ टक्के चेंडूचा ताबा जर्मनीकडे होता, परंतु निर्णायक घाव जपानने घातला. अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया यांच्या सामन्यातही असेच चित्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()