FIFA World Cup 2022 Qatar : चर्चा तर होणारच! कतारमधील आचारसहिंतेत पुरूषांच्या शॉर्टवरही आली बंदी

FIFA World Cup 2022 Qatar Rules
FIFA World Cup 2022 Qatar Rulesesakal
Updated on

FIFA World Cup 2022 Qatar Rules : फिफा वर्ल्डकप 2022 ची सुरूवात 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये होत आहे. पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होणार असून यासाठी 8 ग्रुप करण्यात आले असून एकूण 48 लीग सामने खेळले जाणार आहेत. यानंतर प्रत्येक ग्रुपमधून पहिले 2 संघ पुढच्या फेरीत दाखल होतील. जवळपास एक महिना सुरू राहणारा हा वर्ल्डकप 18 नोव्हेंबरला अंतिम सामन्यासह संपुष्टात येईल.

दरम्यान, जगभारातील फुटबॉल चाहते आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी कतारच्या दिशेने रवाना झाले आहे. फुटबॉल वर्ल्डकपदरम्यान, चाहत्यांचा उत्साह हा एका वगेळ्यात स्तरावर पोहचलेला असतो. मात्र यंदाचा वर्ल्डकप हा एखा इस्लामिक देशात होत असल्याने चाहत्यांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध असणार आहेत. जर कतारमधील नियमांचे उल्लंघन केले तर कडक शिक्षेला सामोरे जावे लागण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे कतारमध्ये वर्ल्डकप पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना कोणकोणत्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे हे पाहुयात.

FIFA World Cup 2022 Qatar Rules
FIFA Revenue Model : क्लब केंद्रीत फुटबॉल, तरी फिफा एवढा बक्कळ पैसा कुठून कमवतं?

हैय्या कार्ड असेल तरच कतारमध्ये प्रवेश

कतारमध्ये वर्ल्डकप पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी ही पहिली अट असेल की त्यांच्याजवळ हैय्या कार्ड असल पाहिजे. या कार्डशिवाय कतारमध्ये प्रवेशच मिळणार नाही. हे कार्डधारकच फुटबॉल सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहू शकतात. या कार्डधारकांना सामन्याच्या दिवशी सार्वजनिक दळणवळण साधनांचा मोफत वापर करता येणार आहे. हे फिफाच्या अधिकृत वेबसाईटवरून हे कार्ड चाहत्यांना मिळवता येणार आहे. यावेळी त्यांना कतारमध्ये कोठे थांबणार, आपत्कालीन संपर्क क्रमांक यांची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच हे कार्ड असेल तर कतारमध्ये वीजा असण्याची गरज नाही. हे कार्ड दाखवून तुम्ही 23 जानेवारी 2023 पर्यंत कतारमध्ये थांबू शकता.

दारू पिण्यावरही निर्बंध

कतार एक मुस्लीम राष्ट्र असल्याने तेथे दारू पिण्यावर बंदी आहे. दरम्यान, जगभरातून येणाऱ्या फुटबॉल चाहत्यांसाठी दारूबाबत काही नियम तयार करण्यात आले आहेत. युरोपमधील फुटबॉल सामन्यादरम्यान चाहते हातात बीअरचा ग्लास घेऊन सामन्याचा आस्वाद घेत असतात. मात्र कतारमध्ये हे चित्र पहावयास मिळणार नाही.

फिफा वर्ल्डकपसाठी कतार सरकारने दारूबाबत काही नियम तयार केले आहेत. या नियामानुसार चाहते सामना सुरू होण्यापूर्वी 3 तास आणि संपल्यानंतर 1 तासानंतरच बीअर खरेदी करू शकतात. सामन्यादरम्यान चाहत्यांना दारू पिण्यास सक्त मनाई असेल. जर कोणी नियम तोडला तर त्याला कडक शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

FIFA World Cup 2022 Qatar Rules
Wasim Jaffer MS Dhoni IPL 2023 : जाफर म्हणतो, धोनी 'या' मराठमोळ्या खेळाडूकडे सोपवणार चेन्नईचे नेतृत्व

तोकडे कपडे घालण्यावरही निर्बंध

कतारमध्ये महिला आणि पुरूष दोघांच्याही कोणते कपडे घालावे याबाबत नियम आहेत. महिलांना टाईट फिटिंगचे कपडे घालण्यास सक्त मनाई आहे. त्यांना खांद्यापासून वरचा भाग देखील झाकावा लागणार आहे. याचबरोबर गुडघ्याच्या वरतीपर्यंतचे शॉर्ट्स कपडे देखील घालता येणार नाहीत. त्यांना पूर्ण पाय झाकले जातील असेच कपडे घालावे लागणार आहेत. हा नियम पुरूषांना देखील लागू आहे. याचबरोबर पुरूषांना मैदानात आपला शर्ट देखील काढण्यास मनाई आहे.

लग्न झालेल्या जोडप्यांनाच हॉटेल रूम

कतारच्या नियमानुसार ज्या जोडप्याचे लग्न झाले आहे त्यांनाच हॉटेलमध्ये रूम मिळणार आहे. लग्न न केलेले जोडपे हॉटेल रूममध्ये एकत्र राहू शकत नाही. कतारमध्ये लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना या गोष्टीची देखील काळजी घ्यावी लागणार आहे.

FIFA World Cup 2022 Qatar Rules
Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()