FIFA WC22 : बाद फेरीत पोहोचण्यासाठी ई गटात चारही संघांत चुरस; माजी विजेत्या जर्मनीचा कस लागणार

या गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीमध्ये बाद फेरीचा गुंता सुटणार...
 Spain-Japan and Germany-Costa Rica
Spain-Japan and Germany-Costa Ricasakal
Updated on

FIFA World Cup 2022 Group E : फिफा विश्वकरंडकातील ई गटामध्ये बाद फेरीत पोहोचण्यासाठी चारही संघांमध्ये कमालीची चुरस लागली आहे. स्पेन व जर्मनी या माजी विजेत्यांसह जपान व कॉस्टा रिका या चारही देशांकडे बाद फेरीत पोहोचण्याची संधी असणार आहे. या गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीमध्ये बाद फेरीचा गुंता सुटणार आहे.

 Spain-Japan and Germany-Costa Rica
IND vs BAN Schedule : टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर...! संपूर्ण शेड्युल एका क्लिकवर

जर्मनी कॉस्टा रिका व जपान-स्पेन यांच्यामध्ये या लढती होणार आहेत. एकीकडे चार गुणांसह अव्वल स्थानावर असलेला स्पेनचा संघ अजूनही बाद फेरीत पोहोचलेला नाही; तर दुसरीकडे अवघ्या एका गुणासह तळाला असलेल्या जर्मनीचा कस लागणार आहे हे निश्चित. जर्मनीला कॉस्टा रिकाला हरवल्यानंतरही बाद फेरीत पोहोचण्यासाठी स्पेन-जपान या लढतीच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

 Spain-Japan and Germany-Costa Rica
FIFA World Cup 2022 : विश्वविजेत्या फ्रान्सवर पराभवाची नामुष्की; ट्युनिशियाने विजयी रथ रोखला

जर्मनीने २०१४ मध्ये विश्वकरंडक जिंकण्याची किमया करून दाखवली होती, पण त्यानंतर २०१८ मध्ये रशिया येथे झालेल्या विश्वकरंडकात त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

'इ' गटातील आजच्या लढती

  • जपान - स्पेन, अल रयान - मध्यरात्री १२.३० वाजता

  • कॉस्टा रिका - जर्मनी, अलखोर - मध्यरात्री १२.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.