FIFA World Cup 2026 schedule : 16 स्टेडियम, 104 सामने; अंतिम सामना अमेरिकेच्या या शहरात; जाणून घ्या वर्ल्ड कपचे शेड्यूल

FIFA विश्वचषक 2026 चे वेळापत्रक: Mexico to play opener at Azteca on June 11, New York to host final...
FIFA World Cup 2026 schedule Marathi News
FIFA World Cup 2026 schedule Marathi News
Updated on

FIFA World Cup 2026 schedule : भारत हा देश क्रिकेटसाठी वेडा आहे, असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. पण फुटबॉल हा जगात सर्वात लोकप्रिय खेळ आहे. कारण जगभरात फुटबॉलचे कोट्यवधी चाहते आहेत. ज्यामध्ये फिफा वर्ल्ड कपची क्रेझ एक वेगळ्याच स्तर आहे.

आता पुढील फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत, फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे ठिकाण काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना न्यू यॉर्क, न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर होणार आहे. फिफाने रविवारी ही घोषणा केली. हा विश्वचषक कधी सुरू होईल आणि त्याचा अंतिम सामना कधी खेळला जाईल हे जाणून घ्या....

FIFA World Cup 2026 schedule Marathi News
Shubman Gill Ind vs Eng : 13 डावांनंतर शुभमन गिल कसा काय आला फॉर्ममध्ये? BCCI ने शेअर केला 'तो' व्हिडिओ

फिफा वर्ल्ड कप 11 जून 2026 पासून सुरू होणार आहे. उद्घाटन सामना मेक्सिको सिटीच्या अझ्टेक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्याच वेळी 19 जुलैला फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय अटलांटा आणि डॅलस या शहरामध्ये उपांत्य फेरीचे सामने होतील.

तीन देशांमधील एकूण 16 शहरे या खेळांचे आयोजन करतील, त्यातील बहुतांश सामने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये होतील.

FIFA World Cup 2026 schedule Marathi News
Ind vs Eng 2nd Test : सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला रचावा लागेल इतिहास... आजपर्यंत भारतात कोणीही केलं नाही 'हे' काम

फिफा वर्ल्ड कप 2022 मध्ये 32 संघ सहभागी झाले होते, पण यावेळी 48 संघ ही स्पर्धा खेळणार आहे. म्हणजेच यावेळी आणखी 24 सामने होतील. म्हणजेच 16 ठिकाणी एकूण 104 सामने खेळवले जातील. स्पर्धेत चार संघांचे 12 गट असतील, त्यापैकी 8 संघांमध्ये बाद फेरीचे सामने खेळवले जातील.

FIFA विश्वचषक 2026 यजमान शहरे -

अटलांटा, बोस्टन, डॅलस, ग्वाडालजारा, ह्यूस्टन, कॅन्सस सिटी, लॉस एंजेलिस, मेक्सिको सिटी, मियामी, मॉन्टेरी, न्यूयॉर्क-न्यू जर्सी, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को बे एरिया, सिएटल, टोरंटो आणि व्हँकुव्हर. (FIFA World Cup 2026 Host Cities)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.