FIFA 2022 : अर्जेंटिना बाद फेरीत! पराभवानंतरही पोलंड अंतिम-16 मध्ये...

पोलंडवर मात करीत अर्जेंटिना बाद फेरीत तर दुसर्‍या सामन्यात मेक्सिकोने सौदी अरेबियाचा 2-1 ने पराभव करत 4 गुणांसह ग्रुप स्टेजचा शेवट....
FIFA World Cup
FIFA World Cupsakal
Updated on

FIFA World Cup 2022 : गुरुवारी अर्जेंटिनाने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात पोलंडचा 2-0 असा पराभव केला. यासह लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने अंतिम-16 मध्ये प्रवेश केला. अर्जेंटिना 6 गुणांसह क गटात अव्वल स्थानावर आहे, तर पोलंडने पराभवानंतरही 4 गुणांसह 16 फेरीत प्रवेश केला आहे. क गटातील दुसर्‍या सामन्यात मेक्सिकोने सौदी अरेबियाचा 2-1 ने पराभव करून 4 गुणांसह ग्रुप स्टेजचा शेवट केला असला तरी, सर्व ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये गोल फरकावर एक गुण नकारात्मक असल्यामुळे मेक्सिकोला राऊंड ऑफ 16 मधून बाहेर पडावे लागले.

FIFA World Cup
FIFA World Cup 2022 : विश्वविजेत्या फ्रान्सवर पराभवाची नामुष्की; ट्युनिशियाने विजयी रथ रोखला

बलाढ्य अर्जेंटिनाने 'क' गटातील लढतीत आज पोलंडचा २-० असा पराभव करीत बाद फेरी निश्चित केली. अर्जेंटिनाकडून अॅलेक्सिस मॅक अॅलेस्टरने व अल् वारेझने उत्तरार्धात गोल केले. मात्र, स्टार खेळाडू मेस्सीची पेनल्टी हुकली, याची रुखरुख चाहत्यांना लागून राहिली होती. पोलंडचा स्टार लेवांडोवस्कीचे मात्र प्रयत्न अपुरे पडले.

उत्तरार्ध सुरू होताच हलकेसे लक्ष विचलित असलेल्या पोलंडवर अर्जेंटिनाने मुसंडी मारत गोल करून झकास सुरुवात केली. ४५ व्या मिनिटाला अॅलेक्सिस मॅक अॅलेस्टरने ही नामी संधी साधली. मोनिलाने मध्यभागापासून मिळालेला चेंडू उजव्या बगल्यातून क्रॉस मारला आणि मध्यभागी असलेल्या अॅलेक्सिस चेंडूवर भन्नाट प्रहार करीत गोल केला. या वेळी गोलरक्षक वोज्शिच स्झेस्नीने मारलेला सूर चेंडू रोखू शकला नाही. यानंतर सामन्याच्या ६७ मिनिटाला ज्युलिअन अल्- वारेझने मिळालेल्या पासवर तीन खेळाडूंना भेदक गोल करीत अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी

FIFA World Cup
FIFA World Cup 2022 : कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम लांबणीवर

भक्कम केली. या स्पर्धेत हा त्याचा बदली खेळाडू म्हणून येऊन केलेला दुसरा गोल आहे. या दोन्ही गोलमध्ये लॉंग पासचा पाया होता. या दरम्यान, पोलंडने केलेल्या आक्रमणांना दुर्दैवाने यश आले नाही. त्यांच्या स्ट्रायकर लोवांडेस्की याची अर्जेंटिनाने पुरती कोंडी केली होती.

हुकलेली पेनल्टी.....

पूर्वार्धात पोलंडच्या डीमध्ये मेस्सीसह आक्रमण फळीतील तिघे चेंडूसह पोचले होते. उजव्या बगलेतून ज्युलिअन अल्वारेझ उंचावरून मेस्सीच्या दिशेने पास दिला. त्या वेळी पोलंड गोलरक्षकाने चेंडू रोखण्यासाठी वोज्शिच स्झेस्नी झेपावला. या क्षणी मेस्सी आणि त्याची हलकीशी धडक झाली. अर्जेंटिनाने पेनल्टीची मागणी केली. निर्णय वॉर (व्हिडिओग्राफी रेफ्री) कडे सोपविण्यात आला. ३८ व्या मिनिटाला मेस्सी पेनल्टी घेण्यासाठी सज्ज झाला. डाव्या पायाने मेस्सीने पेनल्टी घेतली आणि ती दिशा ओळखून स्झेस्नीने त्याच्या डाव्या बाजूला सूर मारत उजव्या हाताने फुटबॉल रोखला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()