FIFA World Cup : मोरोक्कोचा बेल्जियमला हादरा

विजयातील दोन्ही गोल ‘सुपरसब’ खेळाडूंचे
FIFA World Cup
FIFA World Cup
Updated on

दोहा : मोरोक्कोने विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सनसनाटी विजयाची नोंद करताना फिफाच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बेल्जियमला २-० गोलफरकाने हादरा दिला. या कामगिरीसह उत्तर आफ्रिकेतील संघ ‘फ’ गटात अव्वल बनला आहे. सामन्यातील दोन्ही गोल बदली (सुपरसब) खेळाडूंनी नोंदविले.

अल थुमामा स्टेडियमवर रविवारी झालेल्या लढतीत मोरोक्कोने सुनियोजित खेळ केला. ४५+२व्या मिनिटास त्यांच्या हकीम झियेश याचा थेट फ्रीकिक गोल ‘व्हीएआर’ पडताळणीनंतर ऑफसाईड ठरला, मात्र उत्तरार्धात त्यांनी दोन गोल करून बाद फेरी गाठण्याची शक्यता प्रबळ केली. ७३व्या मिनिटास अब्देलहमीद साबिरी याचा फ्रीकिक फटका थेट गोलनेटमध्ये गेला. यावेळी बेल्जियमच्या गोलनेटसमोर चार बचावपटूंचा पहारा होता, पण त्यांना ताकदवान फटक्याचा अंदाज अजिबात आला नाही. नंतर ९०+२ व्या मिनिटास झकारिया अब्दुख्लाल याने बेल्जियमचा अनुभवी गोलरक्षक थिबाऊ कोर्टोईस याला चकवा देत मोरोक्कोच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मोरोक्कोने गटसाखळीतील पहिल्या लढतीत क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. आता त्यांचे दोन लढतीनंतर चार गुण झाले असून बेल्जियमपेक्षा त्यांचा एक गुण जास्त आहे. गटसाखळीतील शेवटची लढत कॅनडाविरुद्ध होईल, तेव्हा मोरोक्कोला बरोबरीचा एक गुण पुरेसा असेल. बेल्जियम संघ पराभवामुळे संकटात सापडला आहे. त्यांना शेवटच्या लढतीत बलाढ्य क्रोएशियाला सामोरे जायचे आहे. गटसाखळीतील आणखी एका सामन्यात क्रोएशियाने कॅनडास नमविल्यास बेल्जियमची वाटचाल खडतर ठरू शकते.

विश्वकरंडकातील तिसराच विजय

मोरोक्कोचा हा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील १८ लढतींपैकी तिसराच विजय ठरला. यापूर्वी १९९४ मधील विश्वकरंडक स्पर्धेत त्यांना बेल्जियमकडून हार पत्करावी लागली होती. मात्र कतारमध्ये मोरोक्कोने जिगरबाज खेळ करत बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना धक्का देण्याची किमया साधली.

बेल्जियमने २०१८ मधील विश्वकरंडकात उपांत्य फेरी गाठली होती. यंदाच्या स्पर्धेत रविवारी तिसऱ्या धक्कादायक निकालाची नोंद झाली. यापूर्वी सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला, तर जपानने जर्मनी या माजी विजेत्यांना हरविले होते. मोरोक्कोने यापूर्वी १९८६ साली बाद फेरी गाठली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()