FIFA WC22: कोणाचे स्वप्न होणार साकार... तिसऱ्यांदा विश्वकरंडक उंचावण्यास अर्जेंटिना अन् फ्रान्स सज्ज

कोणाच्या हातात विश्वकरंडक असणार... अर्जेंटिना की फ्रान्स?
FIFA World Cup Final 2022 Argentina vs France
FIFA World Cup Final 2022 Argentina vs Francesakal
Updated on

FIFA World Cup Final 2022 Argentina vs France : खरे तर दोघेही एकाच क्लबचे खेळाडू. लिओनेल मेस्सी आणि कायलिएन एम्बापे दोघेही एकाच क्लबचे म्हणजेच पीएसजीचे खेळाडू; पण आज एका सर्वोच्च आणि प्रतिष्ठेच्या सामन्यासाठी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. या सामन्यानंतर एकाचा विश्वकरंडक स्पर्धेतील प्रवास थांबणार आहे; तर दुसरा फुटबॉलचा बॅटन पुढे घेऊन जाणार आहे. कोणाचे स्वप्न साकार होणार... कोणाच्या हातात विश्वकरंडक असणार... अर्जेंटिना की फ्रान्स? तिसऱ्यांदा विजेता होण्यासाठी उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

पेले आणि मॅराडोना यांच्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय आणि भावनिक वलय असलेला मेस्सी वयाच्या ३५ व्या वर्षी नाजूक उंबरठ्यावर उभा आहे. त्याच्या मार्गात आहे गतविजेता आणि त्यांचा हुकमी खेळाडू एम्बापे. महानायक आणि नव्या पिढीची सुपरस्टार अशी ही लढाई मेस्सी आणि एम्बापे यांच्यात असली, तरी दोन्ही संघांतील इतर खेळाडूही तेवढेच बहुमोल असणार आहेत. ८० हजारपेक्षा अधिक क्षमतेने खचाखच भरलेले स्टेडियम असेल आणि टीव्ही तसेच ओटीटीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाचे लक्ष या महाफायनलवर असणार आहे.

एकीकडे मेस्सी ऐतिहासिक यशाच्या प्रतीक्षेत आहे; तर एम्बापेही इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे. महान फुटबॉलपटू पेले यांच्याप्रमाणे सलग दोन विश्वकरंडक जिंकून आधुनिक पेले होण्याचा इतिहास एम्बापेला खुणावत आहे. गतवेळेस १९ वर्षांचा असताना एम्बापेने फ्रान्सला दुसऱ्यांदा विश्वकरंडक जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. पेले यांच्यानंतर अंतिम सामन्यात गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. १९५८ च्या स्पर्धेत अंतिम सामन्यात गोल केला तेव्हा पेले १५ वर्षांचे होते.

फ्रान्सचे पारडे जड

फ्रान्सकडे नव्या पिढीचा संघ म्हणून पाहिले जाते. मिशेल प्लॅटिनी, झिनेदिन झिदान, थिएरे हेन्री अशा दिग्गज खेळाडूंचा बॅटन आता एम्बापे पुढे घेऊन जात आहे.

डिडियर डिशॉम्प्सनाही विक्रमाची संधी

उद्याच्या अंतिम सामन्यात खेळाडूंसह फ्रान्सचे प्रशिक्षक डिडियर डिशॉम्प्स यांनाही विक्रमाची संधी आहे. १९९८ मध्ये त्यांनी खेळाडू म्हणून विश्वकरंडक जिंकला होता. आता प्रशिक्षक म्हणून दोनदा वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. अशी कामगिरी इटलीच्या व्हिटोरिओ पोझ्झो यांनीच केली होती. खेळाडू म्हणून यश मिळवल्यावर प्रशिक्षक या नात्याने त्यांनी १९३४, १९३८ मध्ये इटलीला वर्ल्डकप जिंकून दिला होता.

प्रमुख खेळाडू नसतानाही...

फुटबॉलविश्व गाजवणारे महत्त्वाचे खेळाडू नसतानाही फ्रान्सने यंदा अंतिम फेरीपर्यंत थाटात मजल मारली. प्रशिक्षक डिशॉम्प्स यांनी संघाचे मनोबल कमी न होऊ देता समतोलही साधला आहे. गतवेळच्या विजेत्या संघातील पॉल पॉग्बा, एनगोलो कांटे यांच्यासह प्रेसनेल किम्पेंबे,

नवोदित स्टार खेळाडू एन्कुकू आणि बॉलन डिऑर पुरस्कारविजेता करीम बेन्झेमा दुखापतीमुळे खेळत नसले, तरी फ्रान्सची ताकद कमी झालेली नाही. फ्रान्सच्या संघाने या स्पर्धेत एकसंध केला असल्यामुळे आहे.

मेस्सी आणि एम्बापे यांच्यातील लढत जशी केंद्रबिंदू असेल, त्याचप्रमाणे दोन्ही संघांतील इतर खेळाडूही आपला ठसा उमटवण्यास सज्ज झाले आहेत; परंतु मेस्सी आणि एम्बापे यांचे यश अंतिम फेरीपर्यंत तरी समसमान राहिले आहे. दोघांनी ५-५ गोल केले आहेत. त्यामुळे गोल्डन बूट कोण मिळवणार, याचीही उत्सुकता वाढली आहे.

दृष्टिक्षेपात

  • अर्जेंटिनाचा सहावा विश्वकरंडक अंतिम सामना. १९७८ आणि १९८६ मध्ये विजेते आणि १९३०, १९९०, २०१४ मध्ये उपविजेते

  • गेल्या ४२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत अर्जेंटिनाची केवळ एकाच सामन्यात हार. (सौदी अरेबियाविरुद्ध सलामीला)

  • कतारमधील या विश्वकरंडक स्पर्धेत अर्जेंटिनाकडून १२ गोल. १९८६ स्पर्धेत सर्वाधिक १४ गोल

  • अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचा हा दुसरा विश्वकरंडक अंतिम सामना. २०१४ मध्ये जर्मनीविरुद्ध अंतिम सामन्यात हार

  • फ्रान्सची ही चौथी विश्वकरंडक अंतिम लढत. १९९८ आणि २०१८ मध्ये विजेते, तर २००६ मध्ये उपविजेते

  • सलग दुसऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणारा फ्रान्स तिसरा संघ. इटलीने १९३४ आणि १९३८ मध्ये; तर ब्राझीलने १९५८ आणि १९६२ मध्ये सलग दोन स्पर्धांत विजेतेपद मिळवले होते.

  • कायलियन एम्बापेचे यंदा सहा सामन्यांत पाच गोल. २०१८ मधील गतस्पर्धेपेक्षा सरस कामगिरी. विश्वकरंडक स्पर्धांत एकूण १३ सामन्यांत त्याचे नऊ गोल.

आमने-सामने

  • विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात एकूण तीन लढती. २०१८ च्या स्पर्धेत या दोन संघांत अखेरची लढत. त्यात उपउपांत्यपूर्व लढतीत फ्रान्सचा अर्जेंटिनावर ४-३ विजय. मात्र १९३० आणि १९७८ मध्ये अर्जेंटिनाची सरशी.

  • विश्वकरंडक आणि इतर सर्व प्रकारच्या लढतीत अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात १३ सामने. यात अर्जेंटिनाचे सहा विजय; तर फ्रान्सच्या खात्यात तीन विजयांची नोंद; तर तीन सामने बरोबरीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.