FIFA World Cup Qualifiers: भारताचं इतिहास रचण्याचं स्वप्न कतारच्या चिटिंगमुळे भंगलं? AFFI ने केली चौकशीची मागणी

Qatar vs India FIFA World Cup Qualifiers: फिफा वर्ल्ड कप क्वालिफिकेशनच्या तिसऱ्या फेरीत पोहचण्याचे भारताचे स्वप्न कतारविरुद्धच्या पराभवानंतर भंगले. पण या सामन्यात कतारने केलेला गोल वादग्रस्त ठरला.
Qatar vs India FIFA World Cup Qualifiers
Qatar vs India FIFA World Cup QualifiersSakal
Updated on

Qatar vs India FIFA World Cup Qualifiers: फिफा वर्ल्ड कप पात्रतेसाठी दुसऱ्या फेरीतील भारतीय फुटबॉल संघाचा अखेरचा सामना मंगळवारी (11 जून) बलाढ्य कतारशी पार पडला. या सामन्यात कतारने 2-1 अशा गोलफरकाने विजय मिळवला.

मात्र या सामन्यात 73व्या मिनिटाला कतारकडून करण्यात आलेला बरोबरीचा गोल वादात अडकला आहे. आता या गोलबद्दल चौकशीची मागणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) सामन्याच्या आयुक्तांकडे केली असल्याचे समजत आहे.

Qatar vs India FIFA World Cup Qualifiers
India Vs Qatar : FIFA World Cupच्या क्वालिफायरमध्ये झाली चीटिंग? वादग्रस्त गोलमुळे टीम इंडियाचा पराभव

दोहामध्ये हा सामना झाला होता. ७२ व्या मिनिटापर्यंत भारतीय संघ १-० अशा आघाडीवर होता, तसेच चांगल्या लयीत होता. मात्र ७३ व्या मिनिटाला कतारच्या फ्री कीकवर भारताचा गोलरक्षक आणि कर्णधार गुरप्रीत संधूने चांगला बचाव केला. त्याने बॉल अडवला, त्यामुळे बॉल गोलपोस्टच्या बाहेर गेला होता.

मात्र त्यानंतर अल हसनने तो फुटबॉल आत घेतला व युसूफ येमेनने गोल केला. त्यावर रेफ्री किम वू सुंगने गोलही दिला. त्यातच सामन्यात ‘व्हीएआर’ हे तंत्रज्ञान नसल्याचा फटका भारताला बसला. यानंतल भारतीय संघाने लय गमावली. कतारने नंतर ८५व्या मिनिटाला दुसरा गोल केला आणि आघाडी घेतली.

Qatar vs India FIFA World Cup Qualifiers
Sunil Chhetri Video: 19 वर्षे, 151 सामने अन् 94 गोल... सुनील छेत्रीला टीम इंडियाचा सलाम, गार्ड ऑफ ऑनरवेळी अश्रु अनावर

दरम्यान, या गोलबद्दल AIFF च्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की 'आम्ही सामन्याच्या आयुक्तांकडे तक्रार केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जावा याची मागणी केली आहे.' या सामन्यासाठी इराणचे हामेद मोमेनी आयुक्त होते.

आयुक्तांची जबाबदारी असते की सामन्यावर लक्ष ठेवणे आणि सामन्यादरम्यान फिफाच्या नियमांचे पालन केले जाईल, याची काळजी घेणे. आता यावर काय निर्णय येणार हे पाहावे लागणार आहे.

नियमानुसार गोल लाईनच्या बाहेर गेल्यानंतर बॉल आऊट ऑफ प्ले समजला जातो.

दरम्यान, या पराभवामुळे भारतीय संघ दुसऱ्या फेरीतील अ गटामध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे तिसऱ्या फेरीत पहिल्यांदाच प्रवेश करण्यापासून भारतीय संघाला दूरच राहावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.