भारत-अफगाणिस्तान यांच्यात आज अंतिम टी-२० सामना ; निकालापेक्षा रोहितच्या फॉर्मची उत्सुकता

भारत-अफगाणिस्तान यांच्यात आज अंतिम टी-२० सामना
rohit sharma
rohit sharmaSakal
Updated on

बंगळूर : वर्चस्व गाजवून अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघासमोर आता तिसराही सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याची औपचारिकता उद्या पार पाडणार का, यापेक्षा रोहित शर्मा फॉर्मात येणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पहिल्या सामन्यात धावचीत झाला, तर दुसऱ्या सामन्यात त्रिफळाचीत झाला.

मुळात रशीद खानच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजीत दुबळे झालेल्या अफगाणिस्तान संघावर भारताचे वर्चस्व अपेक्षित होते. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत. त्यात शिवम दुबेने हे दोन्ही सामने गाजवून सूर्यकुमार, हार्दिक, केएल राहुल यांच्या अनुपस्थितीतही भारताची दुसरी फळी मजबूत असल्याचे दाखवून दिले.

पहिल्या दोन सामन्यांत सर्व काही अपेक्षेप्रमाणे घडलेले आहे. अपवाद आहे रोहितच्या बॅटमधून धावांचा धडाका सुरू होण्याचा. विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळला नव्हता; परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने १६ चेंडूत २९ धावांची खेळी साकार केली होती. उद्या त्याचे लक्ष्य मोठ्या खेळीकडे असेल. त्यातच तो त्याच्या आयपीएलमधील घरच्या मैदानावर खेळणार आहे.

रोहित शर्मा फॉर्मात नसला, तरी भारतीय संघाला फलंदाजीची चिंता नाही; मात्र गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानचे पहिल्या सामन्यात १५८; तर दुसऱ्या सामन्यात १७२ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे उद्याच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना दीडशे धावांच्या आता रोखण्याचे लक्ष भारतीय गोलंदाजांना बाळगावे लागेल.

अक्षर पटेलने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात तर ४ षटकांत १७ धावां देत २ विकेट मिळवल्या. त्यामुळे तो सामन्यात सर्वोत्तम ठरला होता. त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही विकेट मिळवत आहे, मात्र मुकेश कुमारकडून अधिक धावा दिल्या जात आहेत. निवड समिती शिवम दुबेकडे आता वेगळ्या जबाबदारीतून पाहत आहे.

दुबेने फलंदाजीतील आपली गुणवत्ता सिद्ध केलीच आहे; पण त्याच्याकडून गोलंदाजीची अपेक्षा आहे. दोन्ही सामन्यात त्याने एकेक विकेट मिळवून गोलंदाज म्हणून आपली क्षमता दाखवून दिली आहे; परंतु पूर्ण चार षटके गोलंदाजी करण्याची त्याच्याकडून अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.