Budget 2024 R Praggnanandhaa : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 आज संदसदेत सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी भारताने वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या दमदार कामगिरीचा देखील उल्लेख आपल्या भाषणात केला. त्यांनी भारताचा अव्वल बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानंदचा देखील उल्लेख आपल्या भाषणात केला.
प्रज्ञानंदने 2023 मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या मॅग्नस कार्लसनला कडवी टक्क दिली होती. त्याचा उल्लेख सीतारामन यांनी आपल्या भाषणात केला. यातबरोबर त्यांनी मागच्या सरकारला टोला लगावत सांगितलं की भारताचे बुद्धीबळात 2010 पर्यंत भारताचे 20 ग्रँडमास्टर्स होते. आता भारतात जवळपास 80 ग्रँडमास्टर्स आहेत.
निर्मला सीतारामन आपल्या भाषणात म्हणाल्या, 'आपले युवा क्रीडा क्षेत्रात नवनवी उंची गाठत आहेत. देशाला त्यांचा अभिमान आहे. आपण एशियन गेम्स आणि पॅरा गेम्स 2023 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकली. यावरून आपल्या देशाचा आत्मविश्वास दुणावल्याचं दिसून येतं.'
त्या पुढे म्हणाल्या की, 'बुद्धीबळाची 64 घरे गाजवणारा आपला नंबर एकचा खेळाडू प्रज्ञानंदने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला 2023 मध्ये चांगलेच अडचणीत आणलं होतं. भारतात 2010 मध्ये 20 ग्रँडस्लॅम होते त्या तुलनेत आता 80 पेक्षा जास्त ग्रँडमास्टर्स आहेत.'
गेल्या महिन्यात 18 वर्षाच्या प्रज्ञानंदने चीनच्या लिरेनचा काळ्या मोहऱ्यांसह पराभव केला. त्याने टाटा स्टील बुद्धीबळ स्पर्धेत दिग्गज विश्वनाथन आनंदला इंडियाच्या रँकिंगमध्ये मागे टाकले.
प्रज्ञानंदने वयाच्या 5 व्या वर्षापासून बुद्धीबळ खेळण्यास सुरूवात केली होती. तो भारताचा सर्वात युवा आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला होता. त्याने 2018 मध्ये 12 व्या वर्षी ग्रँडमास्टरचा खिताब पटकावला होता.
भारताने गेल्या काही वर्षात क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे. एशियन गेम्स आणि एशियन पॅरा गेम्समध्ये गेल्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक पदकं पटकावली. भारताने एशियन पॅरा गेम्समध्ये 111 पदकं जिंकली होती. 2018 मध्ये भारताने 72 पदके जिंकली होती.
हांगझू येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताने रेकॉर्ड ब्रेक 107 पदकं जिंकली. यात 28 सुवर्ण पदकं, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.