गुरूग्राम: गुरूग्राम पोलीस ठाण्यात रशियाची माजी टेनिसपटू मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) आणि फॉर्म्युला वनमधील स्टार रेसर मायकल शुमाकर (Michael Schumacher) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दिल्लीतील एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात फसवणूक (Fraud) आणि गुन्हेगारी स्वरूपाचे षडयंत्र (Criminal Conspiracy) रचण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. शारापोव्हा आणि शुमाकर यांच्याबरोबरच इतर 11 जणांविरूद्धही गुन्हा दाखल (Crime Register) झाला आहे.
नवी दिल्लीतील छत्तरपूर मिनी फार्मयेथे राहणाऱ्या शफाली अगरवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी शारापोव्हाच्या नावावर सुरू झालेल्या एका गृहनिर्माण प्रकल्पात (Housing Project) एक अपार्टमेंट बुक केली होती. या प्रकल्पातील एका टॉवरचे नाव शुमाकर होते. हा प्रकल्प 2016 मध्ये पूर्ण होणार होता. मात्र तो अजून सुरूच झालेला नाही. या महिलेने या दोन आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींवर या फसवणुकीत (Fraud) सहभागी असल्याचा आरोप केला आहे. त्यांचे प्रमोटर्सबरोबर लागेबांधे आहेत असाही या महिलेचा आरोप आहे.
शफाली अगरवाल यांनी यापूर्वी गुरूग्राम कोर्टात रिअलटेक डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनी आणि इतर डेव्हलपर्स यांच्याविरूद्ध देखील तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने शारापोव्हा, शुमाकर यांच्यासह या सर्वांनी तिची 80 लाखाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. कोर्टासमोर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत अगरवाल आणि त्यांच्या पतीने गुरूग्राम सेक्टर 73 मधील शारापोव्हाच्या नावाने सुरू झालेल्या प्रोजेक्टमध्ये रहिवासी अपार्टमेंट बुक केली होती. डेव्हलपर कंपनीने अनेक प्रलोभने दाखवत त्यांना या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवले.
त्यानंतर या जोडप्याने तक्रार केली. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, 'आम्हाला या प्रोजेक्टबद्दल जाहिरातीच्या माध्यमातून माहिती मिळाली. आम्ही कंपनीच्या मॅनेजरशी संपर्क साधला. आम्ही खोट्या आश्वासनांना आणि आकर्षक फोटोंना भुललो.' या प्रोजेक्टचे प्रमोटर्स शारापोव्हा आणि शुमाकर यांनी खरेदीदारांची फसवणूक करण्याचे षडयंत्र रचले असा आरोपही अगरवाल यांनी केला. ते म्हणाले की शरापोव्हाने साईटला भेट दिली होती आणि तेथे टेनिस अकॅडमी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
अगरवाल म्हणाले की, 'या प्रोजक्टच्या ब्राऊशरमध्ये अनेक खोटी आश्वासने देण्यात आली होती. शारापोव्हा या प्रोजक्टची प्रमोटर असल्याचे लिहिले होते. तिने खेरदीदारांबरोबर डिनर करण्याचे खोटो आश्वासनही दिले होते. हे सर्व या प्रोजेक्टसाठी करण्यात आले मात्र प्रोजेक्ट काही पूर्ण झाला नाही. या प्रकरणी आता आयपीसी कलम 34, 120 B, 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर दिनकर यांनी सांगितले की, 'न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही एफआयआर दाखल केली असून आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.