या पाच कारणामुळं टीम इंडियाचं मालिका जिंकण्याचं स्वप्न अधूरंच

SA vs IND
SA vs INDSakal
Updated on

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात दमदार केली. दक्षिण आफ्रिकेनं उर्वरित दोन्ही सामन्यात शिताफीनं विजय नोंदवत मालिका जिंकली. विशेष म्हणजे सलामीचा सामना गमावल्यानंतर आफ्रिकेचा संघ खचला ना सेनापती. दुसरीकडे पहिल्या विजयानंतर भारतीय संघात काही बदल झाले आणि अनुभवी खेळाडूंनी त्याच त्या चुका पुन्हा केल्या आणि भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचे स्वप्न अधूरेच राहिले. जाणून घेऊयात भारतीय संघाच्या पराभवामागची पाच प्रमुख कारणे....

ओपनरचा फ्लॉप शो

सेंच्युरियनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात लोकेश राहुलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो फार काळ मैदानात टिकला नाही. त्याच्याशिवाय मयांकलाही मोठी खेळी करता आली नाही. दुसरीकडे आफ्रिकेच्या सलामीवीरांनी भारतीय सलामी जोडीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. ही गोष्ट दक्षिण आफ्रिकेच्या फायद्याची ठरली.

पुजारा- अजिंक्यचा अनुभव ठरला बिनकामी

भारतीय संघाला सर्वात मोठा दगा फटका कुणामुळे बसला असेल तर तो म्हणजे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारामुळे या जोडीला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दोघांनी अर्धशतके करून जागा फिक्स केली. पण तिसऱ्या सामन्यात त्यांना खेळवणं मोठी रिस्कच ठरली.

भारतीय जलदगती गोलंदाजीतील धार दिसली, पण...

भारतीय गोलंदाजांनी आपल्या परिनं सर्व प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्न अपूरे ठरले. शार्दुल ठाकूरने एका सामन्यातील एका डावात 7 विकेट घेतल्या. पण तो ते सातत्य कायम राखू शकला नाही. रबाडा, लुंगी एनिग्डी, मार्को जेसन या तिकडीने जसा मारा केला त्या पद्धतीने आपल्या गोलंदाजी ताफ्यात हालचाल दिसली नाही. ठराविक अंतराने ब्रेक थ्रू मिळवून देण्यात आलेले अपयशामुळे भारतीय पराभवाचा पाया भक्कम होत गेला.

एल्गर- पीटरसन जोडीचा हिट शो

भारतीय गोलंदाजांनी जेव्हा जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना गोत्यात आणले असे वाटले त्यावेळी एकतर एल्गर अडथळा बनून उभा दिसला. नाहीतर पीटरसन याने आपल्याला दिलेल्या संधीचं सोनं करुन भारतीय गोलंदाजांना नमवलं. ही जोडी भारतीय संघाच्या विजयातील अडथळा बनल्याचे पाहायला मिळाले.

पंतला साथ मिळाली असती तर...

रिषभ पंतने सुरुवातीच्या दोन सामन्यात निराश केले. पण निर्णायक सामन्यात संपूर्ण संघ गडगडला असताना त्याने शतकी खेळी केली. त्याला कोणीही साथ दिली नाही. विराट कोहलीच्या 29 धावा आणि लोकेश राहुलच्या 10 धावा वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठला नाही. पंतमुळे पराभव लांबणीवर पडला. पण जर त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली असती तर निकाल निश्चित बदलला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.