Video : रोनाल्डोनं प्रतिस्पर्ध्याला खाली पाडून मारली लाथ

या सामन्यात मँचेस्टर युनायटेड संघाच्या बाजूनं एकही गोष्ट घडताना दिसली नाही.
Football News
Football NewsSakal
Updated on
Summary

मँचेस्टर युनायटेड गोल डागण्यासाठी संघर्ष करत असताना दुसऱ्या बाजूला लिव्हरपूलचा संघ दणादण गोल डागत होता.

मँचेस्टर युनाएटेडचा स्टार खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोनाल्डो लिव्हरपूलचा खेळाडू कर्टिस जोन्स याला लात मारताना दिसते. आपल्या टीमच्या खराब कामगिरीमुळे निराश असलेल्या रोनाल्डोने रागाच्या भरात अखिलाडूवृत्तीचं कृत्य केल्याचे पाहायला मिळते. प्रिमियर लीगच्या ज्या सामन्यात हा प्रकार घडला त्या सामन्यात लिव्हरपूलनं रोनाल्डोच्या मँचेस्टर युनायटेडचा 5-0 असा धुव्वा उडवला.

या सामन्यात मँचेस्टर युनायटेड संघाच्या बाजूनं एकही गोष्ट घडताना दिसली नाही. दुसऱ्या बाजूला लिव्हरपूलचा संघ दणादण गोल डागत होता. रोनाल्डोच्या संघाला साधा एकही गोल करता आला नाही. संघ पराभवाच्या छायेत असताना रोनाल्डो खूपच निराश झाला होता. यावेळी एका खेळाडूने त्याच्याकडून चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात रोनाल्डोनं प्रतिस्पर्ध्याला लाथ मारली.

Football News
जे पाकिस्तान संघानं करुन दाखवलं तेच टीम इंडियाला करावे लागेल!

पहिल्या हाफमध्ये झाला राडा

इंग्लंडमधील ओल्ड ट्रँफर्डच्या मैदानात लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यात सामना रंगला होता. पहिल्या हाफमधील इंज्युरी टाइममध्ये कर्टिस जोन्स आणि रोनाल्डो यांच्यात चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी लिव्हरपूलच्या खात्यात 3 गोल जमा झाले होते. दुसरीकडे मँचेस्टर युनायटेडचा संघ पहिल्या गोलच्या प्रतिक्षेत होता. पिछाडीवर असल्याच्या निराशेतून रोनाल्डोनं प्रतिस्पर्धी संघातील जोन्सवर राग काढला. त्याने अगोदर त्याला जमीनीवर ढकलले आणि त्यानंतर त्याला लाथ मारली.

Football News
T20 WC: पाकिस्तानविरूद्ध विराट 'इथे' चुकला- जहीर खान

याप्रकारामुळे मैदानात काहीवेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांच्या अंगावर जात खुन्नस देताना पाहायला मिळाले. लिव्हरपूलच्या एका चाहत्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या घटनेत रोनाल्डोला रेड कार्ड दाखवायला हवे होते, असे म्हणत त्याने रेफ्रीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.