Football legend Pele passes away : सर्वकाळातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले ब्राझीलचे दिग्गज पेले यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या मुलीने गुरुवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर दुजोरा दिला. कॅन्सरशी झुंज देत असलेल्या ब्राझीलच्या माजी फुटबॉलपटूने उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. या महिन्याच्या सुरुवातीला त्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर त्यांना श्वसन संक्रमण झाल्याचे निदान झाले. पेले यांच्या निधनामुळे संपूर्ण जगात शोककळा पसरली आहे.
फुटबॉलमधील ग्रेट या शब्दाचा उगम पेले यांच्यापासून झाला. ब्राझीलच्या एका छोट्याशा भागातून आलेल्या पेलेने जगामध्ये फुटबॉलची व्याख्याच बदलून टाकली. पेलेने ब्राझीलला तीन वेळा जगज्जेते बनवले. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने 1958, 1962 आणि 1970 मध्ये विश्वचषक जिंकला होता. आतापर्यंत कोणीही त्याच्यापेक्षा जास्त वेळा विश्वचषक जिंकलेला नाही. त्याने एकूण चार विश्वचषक खेळले.
1958 च्या फिफा विश्वचषकात सुदानविरुद्ध विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने दोन गोल केले. पेलेने आपल्या कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले. त्याने ब्राझीलसाठी 92 सामन्यात 77 गोल केले. पेले 1971 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाले.(Pele Only Player To Win Three World Cups Record)
1958 च्या विश्वचषकात वयाच्या 17 वर्षे वेल्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने पहिला विश्वचषक गोल केला. अशाप्रकारे या स्पर्धेत सर्वात तरुण गोल करणारे फुटबॉलपटू पेले ठरले. 1958 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याने 17 वर्षे 244 दिवस वयाच्या फ्रान्सविरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. यासह पेले हॅटट्रिक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. पेलेने अंतिम फेरीतही गोल करून आपल्या संघाला विश्वविजेता बनवले. वयाच्या 18 वर्षापूर्वी फिफा विश्वचषकात गोल करणारा पेले हा जगातील एकमेव खेळाडू आहे.
दोन वर्षांत 100 हून अधिक गोल करण्याचा विक्रमही पेलेच्या नावावर आहे. त्याने 1959 मध्ये 127 आणि 1961 मध्ये 110 गोल केले होते. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. झांबियाचा फुटबॉलपटू गॉडफ्रे चितलू याने 1972 मध्ये क्लब आणि देशासाठी 107 गोल निश्चितच केले, परंतु पेलेप्रमाणे दोन वर्षे 100+ गोलचा टप्पा गाठू शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.