Lionel Messi Retirement : लिओनेल मेस्सी पुढचा वर्ल्ड कप खेळणार? कॅनडाविरुद्ध विजयानंतर अर्जेंटिनाच्या कर्णधारने दिले संकेत

अर्जेंटिनाने बुधवारी पहाटे कॅनडाला पराभूत करीत कोपा अमेरिका या दक्षिण अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
Lionel Messi Retirement
Lionel Messi Retirementsakal
Updated on

Lionel Messi retirement : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्याकडून २०२६मधील फिफा विश्‍वकरंडक खेळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. अर्जेंटिनाने बुधवारी पहाटे कॅनडाला पराभूत करीत कोपा अमेरिका या दक्षिण अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

या विजयानंतर लिओनेल मेस्सी म्हणाला, मी आधीच म्हटल्याप्रमाणे खेळत राहणार आहे. भविष्याचा अधिक विचार न करता प्रत्येक दिवस जगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मी ३७ वर्षांचा आहे. देवालाच माहीत मी केव्हापर्यंत खेळत राहीन.

Lionel Messi Retirement
Gautam Gambhir Coach: 'कारण तो नेतृत्वासाठी...', गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक बनल्यानंतर पत्नी नताशाने काय केली पोस्ट?

२०१६ मधील कोपा अमेरिकेच्या अंतिम फेरीत चिलीविरुद्ध खेळताना अर्जेंटिनाचा पराभव झाला. या लढतीत लिओनेल मेस्सी याला पेनल्टीवर गोल करता आला नाही. यानंतर निराश झालेल्या मेस्सी याने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला. मात्र, सात आठवड्यानंतर त्याने आपली निवृत्ती मागे घेतली. यानंतर मेस्सी ७३ सामन्यांत ५४ गोल करीत आपली चुणूक दाखवली. एवढेच नव्हे तर कोपा अमेरिका व फिफा विश्‍वकरंडक जिंकण्याची किमयाही करून दाखवली. अर्जेंटिना संघाकडून खेळताना आजही तो दमदार कामगिरी करीत आहे. त्यामुळे सध्या तरी त्याला अर्जेंटिनासाठी खेळायचे असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोपा अमेरिकेच्या अंतिम फेरीनंतरही तो खेळत राहणार आहे.

Lionel Messi Retirement
James Anderson: शेवटच्या सामन्यात लेकींना लॉर्ड्सवर मिळालेला मोठा मान पाहून अँडरसनचे डोळेही पाणावले, पाहा Video

अँजेल दी मारीया निवृत्त होणार...

अर्जेंटिनाचा ३६ वर्षीय अनुभवी फुटबॉलपटू अँजेल दी मारीया याच्याकडूनही निवृत्तीची घोषणा करण्यात आली. कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना हा त्याच्या कारकीर्दीचा अखेरचा सामना असणार आहे. २००८मध्ये पदार्पण केलेल्या अँजेल दी मारीया याने १४४ सामन्यांमधून ३१ गोल केले. कोपा अमेरिका व विश्‍वकरंडक जिंकलेल्या अर्जेंटिना संघाचा तोही सदस्य होता. दरम्यान, अर्जेंटिना संघाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनी अँजेल दी मारीया याच्याबाबत मत व्यक्त करताना म्हटले की, अंतिम फेरीचा सामना झाल्यानंतर अँजेल दी मारीया याचे मन वळवण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यासाठी संघाचे दरवाजे कायम खुले असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.