Football : नेमारने महान फुटबॉलपटू पेलेंचा विक्रम मोडला

सौदी अरेबियातील अल हिलाल या क्लबशी नुकताच विक्रमी करार करणाऱ्या नेमारला
krida
kridasakal
Updated on

बेलेम - फुटबॉल सम्राट पेले यांनी ब्राझीलकडून केलेल्या गोलांचा विक्रम नेमारने मागे टाकला आणि घरच्या मैदानावर झालेल्या विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात ब्राझीलने बोलिवियाचा ५-१ असा पराभव केला.

सौदी अरेबियातील अल हिलाल या क्लबशी नुकताच विक्रमी करार करणाऱ्या नेमारला बोलीवियाविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या अर्धात पेनल्टीवर गोल करता आला नाही, परंतु त्याने उत्तराराधात ६१ आणि ९३ व्या मिनिटाल गोल केले आणि ब्राझीलकडून तो सर्वाधिक ७९ गोल करण्याचा पराक्रम केला.

krida
Pune News : कीर्तनातून प्रबोधन,भजनी मंडळांचाही समावेश

महान फुटबॉलपटू पेले यांचा विक्रम आपण पार करू शकू असा विचार कधीच केला नव्हता. पेले यांच्यापेक्षा मी जास्त गोल केले म्हणजे मी मोठा फुटबॉलपटू झालो असा समज कधीच करणार नाही. मला स्वतःचे अस्तित्व तयार करायचं आहे आणि ब्राझील फुटबॉलच्या इतिहासात आपलेही नाव लिहायचे आहे, असे नेमारने सामन्यानंतर सांगितले.नेमार ब्राझीलकडून १२५ सामने खेळला आहे. २०१३ मध्ये ब्राझीलने जिंकलेल्या कॉन्फेडरेशन करंडक विजेतेपदामध्ये नेमारचा समावेश होता.

krida
IND VS PAK : भारत विरुद्ध पाक पुन्हा पावसाचाच खेळ

बोलिवियाविरुद्धच्या सामन्यात रॉड्रेगोने २४ आणि ५२ व्या मिनिटाला गोल केले. त्यानंतर ब्रुनो गिमारेसने गोल करून ब्राझीलला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.

माझ्यासाठी हा दिवस फारच खास आहे. नेमार माझा आयडॉल आहे आणि मी दिलेल्या पासवर त्याने विक्रमी गोल केला हे माझेही भाग्य आहे, असे मत रॉड्रेगोने व्यक्त केले. ब्राझीलचा पुढचा पात्रता फेरीतील सामना पेरूविरुद्ध मंगळवारी होणार आहे.पात्रता फेरीच्या इतर सामन्यांत उरुग्वेने चिलीवर ३-१ अशी मात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.