FIFA U-17 WWC : भारतातील वर्ल्डकपमध्ये ‘वार’ तंत्रज्ञानाचा वापर

फिफाकडून रेफ्री, व्हिडीयो अधिकाऱ्यांची निवड
FIFA U-17 Women World Cup in India
FIFA U-17 Women World Cup in India
Updated on

मुंबई : भारतामध्ये ११ ते ३० ऑक्टोबर यादरम्यान महिलांचा १७ वर्षांखालील विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी फिफाकडून मंगळवारी रेफ्री, सहायक रेफ्री, सपोर्ट रेफ्री व व्हिडीयो अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तसेच या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच व्हिडीयो सहायक रेफ्री (वार) नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे.

फिफा रेफ्री समितीकडून रेफ्रीसह इतर महत्त्वाच्या पदांसाठी नियुक्ती करण्यात आली. यामध्ये १४ महिला रेफ्री, २८ महिला सहाय्यक रेफ्री, ३ सपोर्ट रेफ्री व १६ व्हीडीयो सहाय्यक रेफ्री यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुख्य विश्‍वकरंडकासाठीही संधी

फिफा रेफ्री समितीचे प्रमुख पिअरलुगी कोलिना यांच्याकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले की, भारतातील महिलांच्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडकासाठी रेफ्रींची निवड करण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या रेफ्रींना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड या देशांमध्ये पुढल्या वर्षी महिलांच्या मुख्य विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या विश्‍वकरंडकासाठीही भारतातील स्पर्धेसाठी निवड झालेल्या रेफ्रींना संधी देण्यात येणार आहे, असे ही त्यांनी पुढे नमूद केले.

अचूक निर्णयासाठी व्हीएआरचा उपयोग

फुटबॉलच्या मैदानात चुका टाळण्यासाठी व्हीएआरचा उपयोग करण्यात येतो. व्हीएआरमध्ये मैदानातील रेफ्री व्हिडीयोमध्ये रिप्ले पाहून निर्णय घेतात. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्याआधी चूक होण्याचे प्रमाण कमी होते.

‘वार’मध्ये या चार प्रकारात निर्णयाचे पुनरावलोकन

१) गोल झाला किंवा नाही झाला हे बघण्यासाठी

२) पेनल्टी आहे की नाही हे पाहण्यासाठी

३) थेट लाल कार्ड दाखवण्याबाबत

४) लाल किंवा पिवळे कार्ड चुकीच्या पद्धतीने दिले गेल्यास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.