- प्रणाली कोद्रे
Ishan Pandita’s Journey: भारतीय फुटबॉल म्हटलं की पटकन प्रत्येकासमोर सुनील छेत्री, बायचुंग भुतिया ही नावं सहज तोंडात येऊन जातात. पण त्यांच्यानंतर आता कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल, याच प्रश्नाला घेऊन इंडियन सुपर लीगचा नव्या हंगामाची जाहिरातही समोर आली आहे. ज्यात खुद्द सुनील छेत्री आणि बायचुंग भुतिया हेच भारताच्या नव्या फुटब़ॉल हिरोबाबत कोच, मॅनेजर, संघमालक, सामान्य लोकांकडून याबाबत प्रश्न विचारत आहेत.
खरंतर नवा हिरो बनण्यासाठी भारतात सध्या अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत, जसे कियान नासिरी, मोहम्मद एमेन, जॅक्सन सिंग, लारा शर्मा असे अनेक, ज्यामध्ये आणखी एक नाव आहे ते म्हणजे इशान पंडिता.
२६ वर्षीय इशान ज्याच्याकडे भविष्यातील स्टार म्हणून पाहिलं जातंय. फिलिपाइन्समधील बालपण, १६ वर्षी फुटबॉलसाठी स्पेनला जाणं ते भारतीय संघापर्यंतचा प्रवास इशानचा झालाय. त्याच्या याच प्रवासाबाबात सकाळने त्याच्याशी संवाद साधला. तो त्याच्या प्रवासाबाबत काय म्हणाला पाहू...