भारतात होणाऱ्या चेस ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच मशाल प्रज्वलन : ठाकूर

For the first time in Chess Olympiad Chess Torch Relay launched PM Modi will inaugurate on June 19
For the first time in Chess Olympiad Chess Torch Relay launched PM Modi will inaugurate on June 19 esakal
Updated on

नवी दिल्ली : भारत यंदाचे चेस ऑलिम्पियाड आयोजित करणार आहे. दरम्यान, या जागतिक स्पर्धेवेळी पहिल्यांदाच चेस मशाल प्रज्वलनाची प्रथा सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. याचे उद्घाटन 19 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. For the first time in Chess Olympiad Chess Torch Relay launched PM Narendra Modi will inaugurate on June 19 Says Anurag Thakur)

For the first time in Chess Olympiad Chess Torch Relay launched PM Modi will inaugurate on June 19
KKR नंतर शाहरुखने खरेदी केली महिला क्रिकेटची टीम, ट्विटरवर म्हणाला...

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला सांगण्यास आनंद होत आहे की ज्या ज्या वेळी चेस ऑलिम्पियाड आयोजित केले जाईल त्या त्यावेळी त्याची मशाल भारतातून प्रज्वलित केली जाईल.' अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, 'भारत चेस ऑलिम्पियाड आयोजित करण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास 190 देशांमधील 3000 खेळाडू भारतात येणार आहेत. ज्या देशातून बुद्धीबळ खेळाची निर्मिती झाली त्या भारताच्या संस्कृतीचा अनुभव ते घेणार आहे. ज्या प्रमाणे खेलो इंडिया देशभर पसरला त्याचप्रमाणे खेलो चेस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी आम्ही वेगाने काम करणार आहोत.'

For the first time in Chess Olympiad Chess Torch Relay launched PM Modi will inaugurate on June 19
PCB ने राष्ट्रीय कोचला केले निलंबित; महिला क्रिकेटपटूचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप

चेस ऑलिम्पियाडची मशाल रॅली देशाची राजधानी दिल्लीतून सुरू होईल. त्यानंतर ती 75 शहरामधून जात 27 जुलैला महाबलीपूरम येथे पोहचणार आहे. या 75 शहरांमध्ये लेह, श्रीनगर, जयपूर, सुरत, मुंबई, भोपाळ, पटना, कोलकाता, गंगटोक, हैदराबाद, बंगळुरू, त्रिशूर, पोर्ट ब्लेअर आणि कन्याकुमारी या शहरांचा समावेश आहे. भारतात होणारे 44 वे चेस ऑलिम्पियाड 28 जुलैपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा 10 ऑगस्टपर्यंत चालेल. या स्पर्धेसाठी इतिहासातील सर्वात जास्त खेळाडूंची नोंदणी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.