Rajiv Mishra Death : भारतीय क्रीडा जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताच्या माजी खेळाडूच्या निधनामुळे क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.
टीम इंडियाचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू राजीव मिश्रा यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. वाराणसीतील नारायणपूर येथील त्यांच्या घरी अत्यंत खराब अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
मिल्टन केन्स इंग्लंड येथे 1997 मध्ये झालेल्या ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेतील भारताचा आघाडीचा स्ट्रायकर राजीव मिश्रा यांचा वयाच्या 46 व्या वर्षी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे.
वाराणसीतील नारायणपूर येथील त्याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. शिवपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता राजीव मिश्रा यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
राजीवने 1997 च्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 2-3 असा पराभव झाला असला तरी मिश्राला स्पर्धेत सहा गोलांसह भारतीय हॉकीचा पुढचा स्टार म्हणून पाहिले जात होते. ते वाराणसीमध्ये उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागात मुख्य तिकीट निरीक्षक या पदावर होतो आणि घरात एकटेच राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येतही बिघडली होती.
हॉकी इंडियाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमचे माजी ज्युनियर आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आणि 1997 FIH ज्युनियर पुरुष विश्वचषक रौप्यपदक विजेता राजीव मिश्रा यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष आणि मिश्राचा 1997 ज्युनियर विश्वचषकातील सहकारी दिलीप टिर्की यांनीही राजीव मिश्रा यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला. टिर्की यांनी ट्विट केले की, 'प्रतिभावान माजी ज्युनियर आंतरराष्ट्रीय हॉकीपटू राजीव मिश्रा यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले. त्याची खेळाबद्दलची आवड आणि समर्पण खरोखरच प्रेरणादायी होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि संपूर्ण हॉकी समुदायाप्रती माझ्या संवेदना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.