Birendra Lakra | ऑलिम्पिक पदक विजेत्या हॉकीपटूवर खून केल्याचा आरोप

Former Indian Hockey Team Captain Birendra Lakra Murder Allegation Who Won Olympic Medal
Former Indian Hockey Team Captain Birendra Lakra Murder Allegation Who Won Olympic Medalesakal
Updated on

भुवनेश्वर : भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू बिरेंद्र लाकडावर त्याच्या मित्राचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाकडावर त्याच्या गर्ल्डफ्रेंड मनजीत टेटे हिच्या साथीने आपला बालपणीचा मित्र आनंद टप्पोचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यात झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. आनंदचा मृतदेह 26 फेब्रुवारी 2022 मध्ये भुवनेश्वरमधील त्याच्या घरी आढळून आला होता. सुरूवातीच्या तपासात ही आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र त्यानंतर आनंदच्या वडिलांनी बिरेंद्र लाकडावर खूनाचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली. (Former Indian Hockey Team Captain Birendra Lakra Murder Allegation)

Former Indian Hockey Team Captain Birendra Lakra Murder Allegation Who Won Olympic Medal
इंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इऑन मॉर्गनने घेतली निवृत्ती

आनंदच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी करत पोलिसांवर योग्य प्रकारे तपास न करणे आणि मदत न करण्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आनंदच्या हत्येपूर्वी 10 दिवस आधी त्याचे लग्न झाले होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर बिरेंद्र लाकडाने कोणतेही वक्तव्य दिलेले नाही.

आनंदचे वडील बंधन टप्पो यांच्या सांगण्यानुसार आनंद आणि बिरेंद्र लाकडा यांच्यात त्याच्या गर्लंफ्रेडवरून काही वादावादी झाली होती. यानंतर लाकडा आणि त्याची गर्लंफ्रेड मनजीतने मिळून आनंदचे हात पाय बांधून त्याचा गळा आवळला आणि खून केला. यानंतर याला आत्महत्येचे रूप देण्यात आले. या घटनेला आता चार महिने होत आले आहेत तरी पोलिसांनी यावर काही ठोस कारवाई केलेली नाही.

Former Indian Hockey Team Captain Birendra Lakra Murder Allegation Who Won Olympic Medal
आयसीसीचं ट्विट रोहितच्या जागी कोण; हरभजन म्हणतो...

बिरेंद्र लाकडा कोण आहे?

बिरेंद्र लाकडा हा दीर्घ काळापासून भारतीय हॉकी संघात खेळत होता. त्याने गेल्या टोकियो ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेतली होती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने कांस्य पदक मिळवले होते. त्या संघाचा विरेंद्र लाकडा उपकर्णधार होता. याचबरोबर तो आशिया कपमध्ये खेळलेल्या भारतीय संघाचे कर्णधारपदही लाकडाने भुषवले आहे. याचबरोबर लाकडा ओडिसा पोलीस दलात डीवायएसपी पदावर देखील कार्यरत आहे.

बिरेंद्र लाकडा याच्याबरोबरच त्याच्या घरातील अजून दोन सदस्य देखील भारताकडून हॉकी खेळले आहेत. त्याचा भाऊ बिमल टीम इंडियात मिडफिल्डर म्हणून खेळत होता तर बिरेंद्रची बहिण अंसुता भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार देखील राहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()