IPL 2023 : "पैशाचा माज अन् अहंकारी BCCI! आमच्या खेळाडूंना खेळू दिले नाही तर…" पाकचे माजी PM बरसले

पाकिस्तानचा माजी कर्णधारने बीसीसीआयला सुनावले खडे बोल...
Imran Khan Slams BCCI
Imran Khan Slams BCCI
Updated on

Imran Khan Slams BCCI : पाकिस्तानचा विश्वचषक विजेता कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय क्रिकेट बोर्डावर (BCCI) हुकूमशाहीचा आरोप केला आहे. बीसीसीआय क्रिकेट विश्वात महासत्तेसारखे वागत आहे, हे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू न देण्याचा भारतीय बोर्डाचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचेही इम्रान खान यावेळी म्हणाले आहेत.

Imran Khan Slams BCCI
IPL 2023: लाखो लोकांच्यासमोर अरिजित सिंग पडला धोनीच्या पाया! कारण काय बॉलीवूडला पडला प्रश्न

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये आशिया चषकाच्या यजमानपदावरून वाद सुरू आहे. पीसीबीला कोणत्याही किंमतीत आशिया चषकाचे आयोजन करायचे आहे, तर बीसीसीआयने आशिया चषक पाकिस्तानात आयोजित केल्यास भारतीय संघ तेथे जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयच्या या वृत्तीमुळे भारतीय संघाचे सर्व आशिया चषक सामने पाकिस्तानबाहेर आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी याबाबत अधिकृत वक्तव्य येणे बाकी आहे, मात्र या सगळ्यात इम्रान खान यांनी बीसीसीआयला खडे बोल सुनावले आहेत.

Imran Khan Slams BCCI
IPL 2023: लखनौमध्ये खेळल्या जाणारा LSG vs DC तिसरा सामना रद्द? मोठे कारण आले समोर

पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानने टाईम्स रेडिओला दिलेल्या मुलाखतीत बोलले की, मला हे विचित्र वाटते की भारतीय क्रिकेट बोर्ड पाकिस्तानी खेळाडूंना आपला अहंकार दाखवत आहे. त्याकडून फक्त अहंकाराचा वास येतो. आपला मुद्दा पुढे ठेवत इम्रान खान म्हणाले की, बीसीसीआय जर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू देत नसेल तर काही हरकत नाही.

Imran Khan Slams BCCI
IPL 2023: ऋतुराज गायकवाडचे थोडक्यात हुकले शतक! ४ चौकार ९ गगनचुंबी षटकार... ठोकल्या ९२ धावा

याशिवाय, आपला मुद्दा पुढे ठेवत माजी पाकिस्तानी कर्णधाराने असेही म्हणाले की 'भारतीय क्रिकेट नियामक मंडळ' आता 'अहंकारी' बनले आहे, कारण त्यांना तेथे 'भरपूर पैशा' मिळत आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध हे दुर्दैवी आहे. भारत आता ज्या प्रकारे क्रिकेट जगतात एक महासत्ता म्हणून उदयास आला आहे, त्यात खूप अहंकार भरला आहे. भरपूर पैसा मिळाल्याने भारतीय बोर्ड उद्धटपणे वागत आहे. त्यांना कोणाशी खेळायचे आहे आणि कोणाशी नाही हे ते ठरवतात.

आयपीएल 2023 31 मार्चपासून सुरू झाले आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.