भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) हा सामना जगभरातील प्रेक्षकांसाठी पर्वणीचा ठरतो. आता हे संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. पण पाकिस्तान बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष रमीझ राजा भारताविरुद्ध खेळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच पाकिस्तान बोर्डाचे माजी अध्यक्ष एहसान मनी (Ehsan Mani) यांनी मोठे वक्तव्य करत सवाल उपस्थित केला आहे.
माझ्या कार्यकाळात आम्ही कधीही भारताकडे क्रिकेट खेळण्यासाठी विनंती केली नव्हती. जर भारताला आमच्यासोबत क्रिकेट खेळायचे असेल, तर त्यांनी स्वत: पाकिस्तानात यावे. आपण त्यांच्या मागे धावण्याची गरज नसल्याचे मनी यांनी म्हटले आहे.
एहसान मनी नेमकं काय म्हणाले?
मी नेहमीच स्पष्टपणे म्हटले आहे की, जर भारतीय संघाला आमच्यासोबत खेळायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानात यावे. मी कधीही भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकांसाठी नकार दिला नव्हता. परंतु आमचाही आपला आत्मसन्मान आहे. आम्ही भारताच्या मागे का धावावे? आम्ही अजिबात असेल नाही केले पाहिजे. जेव्हा त्यांना खेळायचे असेल, तेव्हाच आम्हीही खेळू. असे विधान मनी यांनी केले.
पाकिस्तान बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष (PCB Chairman) रमीझ राजा यांनी नुकताच 4 देशांमध्ये मालिका खेळवण्याचा प्रस्ताव आयसीसीला दिला होता, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानव्यतिरिक्त इतर 2 मोठ्या देशांचा समावेश होता. परंतु आयसीसीने हा प्रस्ताव नामंजूर केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.