नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी अखेर निवड झाली आहे. माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंहचा जवळचा सहकारी असलेल्या संजय सिंह यांची नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. (Former WFI chief Brij Bhushan Sharan Singh aide Sanjay Singh elected as new president of Wrestling Federation of India)
अध्यक्षपदी निवड होताच संजय सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की, "आता लवकरच कुस्तीचे राष्ट्रीय कॅम्प आयोजित केले जातील. पण ज्या खेळाडूंनी राजकारण करायचं आहे त्यांनी ते करावं अन् ज्यांना कुस्ती खेळायची आहे त्यांनी खेळावं" (Marathi Tajya Batmya)
संजय सिंह यांच्या उमेदवारीवर आक्षेप
११ डिसेंबर रोजी पहिलवान बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी क्रीडा मंत्र्यांना आवाहन केलं होतं की, संजय सिंह यांना WFI च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंध करावा. कारण सरकारनेच आश्वासन दिलं होतं की, ब्रिजभूषण सिंहशी संबंधीत कोणीही ही निवडणूक लढणार नाही. या विश्वासावरच कुस्तीपटूंनी आपला विरोध मागे घेतला होता. (Latest Marathi News)
कोण आहेत संजय सिंह?
संजयकुमार सिंह हे बबलू नावानंही ओळखले जातात. ते उत्तर प्रदेशच्या कुस्तीसंघाचे आणि राष्ट्रीय कुस्ती संघ या दोन्ही ठिकाणी पदाधिकारी आहेत. सन २०१९ मध्ये भारतीय कुस्ती संघाच्या कार्यकारी कमिटीमध्ये संयुक्त सचिव म्हणून त्यांची निवड झाली होती. म्हणजेच WFI च्या गेल्या कार्यकारिणीत त्यांचा समावेश होता.
उत्तर प्रदेशातील चांदौली इथले ते रहिवासी आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा हे कुस्तीचे सामने भरवत असायचे. त्यामुळेच संजय सिंह यांच्यावरही कुस्तीचे संस्कार झाले. २००८ मध्ये ते वाराणसी कुस्ती संघाचे जिल्हाध्यक्ष बनले. त्यानंतर २००९ मध्ये उत्तर प्रदेशचा कुस्ती संघ तयार झाल्यानंतर ब्रिजभूषण सिंह प्रदेशाध्यक्ष बनले आणि संजय सिंह उपाध्यक्ष. पूर्वांचलच्या महिला कुस्तीपटूंना राष्ट्रीय स्तरावर आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.
संजयकुमार सिंह हे ब्रिजभूषण सिंहच्या जवळचे सहकारी मानले जातात. या दोघांचे कौटुंबिक संबंध आहेत. गेल्या तीन दशकांपासून हे दोघेही कुस्तीसाठी सोबत काम करत आहेत. आपल्या विजयाची खात्री संजय सिंह यांना होती. मतदानापूर्वीच सिंजय सिंह यांनी आपण निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.