World Cup 2023 : गतविजेत्या इंग्लंडचा तब्बल 38 तासापेक्षा जास्त 'इकॉनॉमी' प्रवास; बेअरस्टो पोस्ट करून म्हणतो...

World Cup 2023 England Cricket Team
World Cup 2023 England Cricket Teamesakal
Updated on

World Cup 2023 England Cricket Team : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी अनेक संघ दाखल होत आहेत. गतविजेता इंग्लंड देखील भारतात दाखल झाला. मात्र त्यांना प्रवास करताना खूपच त्रास झाल्याचे दिसते आहे. इंग्लंडचा विकेटकिपर जॉनी बेअरस्टोने इन्स्टाग्रामवर स्टोरी अपडेट करत इंग्लंडने कसा 38 तासापेक्षा जास्त काळ इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला हे सांगितले.

बेअरस्टोने इंग्लंडच्या खेळाडूंचे विमानातील इकॉनॉमी क्लासमधील फोटो शेअर करत अव्यवस्थेचा कळस असे कॅप्शन दिले. या फोटोत इंग्लंडचे खेळाडू पार थकून गेल्याचे दिसत आहे.

World Cup 2023 England Cricket Team
Babar Azam : पाऊस पडला मात्र... भारतातील पहिल्याच सामन्यात कसा खेळला बाबर?

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंड आणि भारतीय संघ गुवाहाटी येथे पोहचले आहेत. आज ( दि. 30 सप्टेंबर) गतविजेत्यांसोबत भारताचा सराव सामना आहे. इंग्लंड वर्ल्डकपपूर्वी दोन सराव सामने खेळणार आहे. पहिला सामना भारतासोबत आणि त्यानंतर दुसरा सामना हा बांगलादेशसोबत 2 ऑक्टोबरला होणार आहे.

भारतीय संघ इंग्लंडसोबत आपला पहिला सराव सामना खेळल्यानंतर नेदरलँडसोबत दुसरा सराव सामना 3 ऑक्टोबरला खेळणार आहे. भारताचा वर्ल्डकपमधील पहिला सामना 8 ऑक्टोबरला बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. तर इंग्लंड आपला पहिला सामना 5 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरूद्ध खेळणार आहे. हा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये हे दोन्ही संघ फायनल खेळले होते.

World Cup 2023 England Cricket Team
Asian Games 2023 : बॅडमिंटनमध्ये भारताने इतिहास रचला, तब्बल 37 वर्षांनी येणार पदक

इंग्लंडचा संघ :

जॉस बटलर, मोईन अली, गस अटकिन्सन, जॉीन बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, लिम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, अदिल राशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रीसे टॉप्ले, डेव्हिड विली, मार्क वूड, ख्रिस वोक्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.