Sebastian Vettel : चार वेळा F1 जिंकणाऱ्या सबॅस्टियन व्हेट्टलेने घेतली निवृत्ती

Four Time Formula One World Champion Sebastian Vettel announcement Retirement
Four Time Formula One World Champion Sebastian Vettel announcement RetirementESAKAL
Updated on

Sebastian Vettel : चार वेळा एफ 1 जागतिक अंजिक्यपद पटकावणाऱ्या सबॅस्टियन व्हेट्टलेने (Sebastian Vettel) आज फॉर्म्युला (Formula One) वनमधून निवृत्ती जाहीर केली. तो 2022 च्या हंगामानंतर निवृत्त (Retirement) होणार आहे. जर्मनीच्या 35 वर्षीय रेसर अॅस्टॉन मार्टिन (Aston Martin) संघाचा सदस्य होता. तो 2010 ते 13 दरम्यान रेड बूलकंडून खेळला. तर फेरारीसोबतही तो 6 हंगाम होता. त्याने हंगेरियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेच्या तोंडावर निवृत्तीचा निर्णय घेतला.

Four Time Formula One World Champion Sebastian Vettel announcement Retirement
Commonwealth Games 2022 : भारताचे सामने केव्हा अन् कोठे पाहाल?

सबॅस्टियनने 2010, 2011, 2012 आणि 2013 ला एफ वन अजिंक्यपद पटकावले होते. त्याच्या नावावर 53 विजय, 57 पोले पॉजिशन आणि 122 पोडियम फिनश आहेत. सबॅस्टियनने बीएमडब्ल्यू सौबेरमध्ये टेस्ट ड्रायव्हर म्हणून आपली कारकिर्द सुरू केली. त्यानंतर तो पूर्णवेळ ड्रायव्हर झाला.

निवृत्तीची घोषणा करताना सबॅस्टियन म्हणाला, 'गेल्या 15 वर्षात फॉर्म्युला वनमध्ये काही चांगल्या व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. ती नावे इतकी आहेत की प्रत्येकाचे नाव घेणे शक्य होणार नाही. मी गेल्या दोन वर्षापासून अॅस्टोन मार्टिन अरामको कॉग्निझंट फॉर्म्युला टीमसोबत टीम ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. जरी आम्हाला अपेक्षित यश मिळाले नसले तर येणाऱ्या काही वर्षात हा संघ आपली सर्वोच्च गुणवत्ता सिद्ध करून दाखवले.'

Four Time Formula One World Champion Sebastian Vettel announcement Retirement
Commonwealth Games 2022 : कोरोनाची धास्ती! भारताच्या ध्वजधारक सिंधूच्या रिपोर्टमध्ये...

सबॅस्टियन पुढे म्हणाला की, 'निवृत्तीचा निर्णय घेणे माझ्यादृष्टीने कठिण होते. मी हा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार केला. आता पुढे काय करायचे याचा विचार मी वर्ष संपेपर्यंत करणार आहे. एक वडील म्हणून मी माझ्या कुटुंबाला वेळ देणार आहे हे नक्की, आजचा दिवस काही निरोपाचा नाही तर सर्वांचे आभार मानण्याचा आहे. फॅन्सचेही आभार कारण त्यांच्याशिवाय फॉर्म्युला वनचे अस्तित्वतच नसतं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.