Frances Tiafoe: कोणत्याही खेळात अंपायर महत्त्वाची भूमिका निभावत असतो. टेनिसमध्येही अंपायरची भूमिका महत्त्वाची असते. अशाच अंपायर्सविरुद्ध गैरकृत्य करणाऱ्या खेळाडूंना कारवाईलाही सामोरं जावं लागते. पण अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो याला त्याने केलेल्या गैरकृत्याबद्दल भरभक्कम दंड भरावा लागणार आहे.
त्याने गेल्या महिन्यात शंघाय मास्टर्स स्पर्धेत अंपायरविरुद्ध गैरकृत्य केले होते. त्यामुळे असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP) जी पुरुष टेनिसचे कामकाज पाहाणारी असोसिएशन आहे त्यांनी जाहीर केले आहे की टियाफो याला खेळण्यापासून निलंबित करण्यात येणार नाही, पण त्याला १२०,००० अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण १.१ कोटी रुपयाचा दंड भरावा लागणार आहे.