Franz Beckenbauer : फुटबॉल विश्वात पसरली शोककळा; महान जर्मन खेळाडूचे निधन

Football Legend Franz Beckenbauer News |
Football Legend Franz Beckenbauer News Marathi
Football Legend Franz Beckenbauer News Marathi
Updated on

Football Legend Franz Beckenbauer dead aged 78 News : जर्मनीला खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून वर्ल्ड कप जिंकून देणारे महान फुटबॉलपटू फ्रान्झ बेकेनबाउर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

"आमचे वडील फ्रान्झ बेकेनबाउर यांचे काल (रविवार) निधन झाल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे," फ्रान्झ बेकेनबाउरच्या कुटुंबाने जर्मन वृत्तसंस्था डीपीएला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Football Legend Franz Beckenbauer News Marathi
IPL 2024 : मोहम्मद शमीपासून ते हार्दिक पांड्यापर्यंत...! हे 4 मोठे खेळाडू IPL मधून जाणार बाहेर?

मात्र, या निवेदनात मृत्यूचे कारण सांगितले नाही. 1974 मध्ये संघाचे नेतृत्व करून पश्चिम जर्मनीला विश्वविजेते बनवण्यात फ्रान्झ बेकेनबाउरने महत्त्वपूर्ण योगदान दिले. 1990 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवणाऱ्या राष्ट्रीय संघाचेही त्यांनी कोचपद भूषवले. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये त्यांची गणना होते.

Football Legend Franz Beckenbauer News Marathi
Riyan Parag : 6,6,6,6,6,6,6.... 12 षटकार अन् 56 चेंडूत धुंवाधार शतक! परागने ठोठावला थेट टीम इंडियाचा दरवाजा

जर्मनीचे मुख्य प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन यांना बेकेनबाउर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जर्मनीचे मुख्य प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन म्हणाले की, माझ्यासाठी बेकेनबाउर हा जर्मन इतिहासातील सर्वोत्तम फुटबॉलपटू होता. तो फुटबॉलपटू आणि नंतर प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट होता.

फ्रान्झ बेकेनबाउरची कारकीर्द (Franz Beckenbauer career)

फ्रान्झ बेकेनबाउरने 19 वर्षांच्या कारकिर्दीत 109 गोल केले, त्यापैकी 64 हे बायर्न म्युनिचसाठी त्याच्या 439 सामन्यांमध्ये आले. बायर्न म्युनिचसह बेकेनबाउरच्या कामगिरीमध्ये बुंडेस्लिगा पाच वेळा जिंकणे, चार जर्मन कप जिंकणे आणि 1974 ते 1976 पर्यंत संघाला सलग तीन युरोपियन चषक जिंकणे यांचा समावेश आहे. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तितकीच प्रभावी होती, ज्यामध्ये त्याने पश्चिम जर्मनीसाठी 14 गोल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.