French Open: कूल फेडरर झाला 'अँग्रीमॅन'; अंपायरवर काढला राग

Roger Federer
Roger Federer Roland-Garros Twitter
Updated on

French Open 2021 : विक्रमी 20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या रॉजर फेडररने (Roger Federer) गुरुवारी फ्रेंच ओपनच्या (French Open 2021) प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या फेरीतील लढतीत फेडररने क्रोएशियाच्या मारिन चिलीच (Marin Cilic) पराभूत केले. मागील वर्षी केवळ दोन स्पर्धा खेळणाऱ्या फेडररचे क्ले कोर्टवर रेकॉर्ड फारसे चांगले नाही. याशिवाय मोठ्या ब्रेकनंतर तो ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत असल्याने चाहत्यांना त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. अपेक्षांचे ओझे पेलताना कूल रॉजर फेडरर अँग्री मॅन झाल्याचे पाहायला मिळाले. (French Open 2021 Roger Federer loses cool after feud with chair umpire in win over Marin Cilic)

चिलिच आणि फेडरर 11 व्या वेळेस समोरासमोर आले होते. यात फेडररने 6-2, 2-16, 7-6, 6-2 असा चिलीच विरुद्ध दहावा सामना जिंकला. या लढतीदरम्यान फेडररने दुसरा सेट गमावला. दुसऱ्या सेटवेळी फेडरर चेअर अंपायर इमॅन्यूल जोसेफ यांच्यासोबत भिडल्याचे पाहाला मिळाले. दुसरा सेट गमावल्यानंतर त्याने झोकात कमबॅक केले असले तरी शांत डोक्याने खेळणारा फेडरर भडकला कसा? असा प्रश्न चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.

Roger Federer
गांगुली-कॉन्वे यांच्यातील योगायोगाचा कमालीचा चौकार

दुसऱ्या सेटमध्ये फेडरर 1-3 अशा फरकाने पिछाडीवर होता. त्यावेळी चेअर अंपायरने त्याला टाइम वॉयलेशनची वॉर्निंग दिली. (दोन पॉइंटमध्ये अधिक वेळ घेतल्याबद्दल अंपायरकडून दिलेला कॉल) अंपायरच्या निर्णयानंतर फेडरर चांगलाच भडकला. मी टॉवेल घ्यायला ही जाऊ नको का? असा प्रश्न फेडररने अंपायरला केला. एवढेच नाही तर मी स्लो खेळतोय का? असा प्रश्न त्याने चिलिचलाही विचारला. यावेळी चिलिचने हो तू स्लो खेळतोय असेही म्हटले. दरम्याने फेडररने अंपायर आणि प्रतिस्पर्ध्याशी काही वेळ चर्चाही केली. मला नियम माहित आहे. टॉवेल घेण्यासाठी एका कोपऱ्यावरुन दुसऱ्या कोपऱ्यावर जातोय. ही गोष्ट मी मुद्दाम करत नाही, असे फेडररने म्हटले. तिसऱ्या सेटमध्ये चिलीचला देखील टाइम वॉइलेशनची वॉर्निंग मिळाल्याचे पाहायला मिळाले.

Roger Federer
ऋतुराज 10 महिन्यांनी धोनीच्या शॉकिंग निर्णयावर बोलला

जोकोविचचा विजयी धडाका सुरुच

सर्बियाचा अव्वल मानांकित जोकोविचने देखील फ्रेंच ओपन स्पर्धेत आगेकूच केलीये. त्याने उरुग्वेच्या पाब्लो याला 6-3, 6-2, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या मानांकित डेनिल डॅनिल मेदवेदेवने अमेरिकेच्या टॉमी पॉल याला 3-6, 6-1, 6-4, 6-3 असे पराभूत करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.