French Open 2022: नदाल आणि जोकोविच आज उपांत्यपूर्व फेरीत भिडणार

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा
french open 2022 rafael nadal vs novak djokovic
french open 2022 rafael nadal vs novak djokovicesakal
Updated on

French Open 2022: आंतरराष्ट्रीय टेनिसमधील दोन महान टेनिसपटू नोवाक जोकोविच व राफेल नदाल हे फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. जोकोविच - नदाल यांच्यामधील बहुप्रतिक्षित लढतींची उत्सुकता शिगेला पोहोचली असून या लढतीतील विजेता उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. त्यामुळे दोघांपैकी एकालाच लाल मातीवरील बादशहा होण्याची संधी असणार आहे.(french open 2022 rafael nadal vs novak djokovic)

जोकोविचने डिएगो श्‍वार्त्झमन याला ६-१, ६-३, ६-३ अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत करीत आगेकूच केली. नदालला मात्र विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. स्पेनच्या दिग्गज टेनिसपटूला कॅनडाच्या फेलिक्स एलीयासिम याच्याकडून कडवी झुंज मिळाली. पहिला सेट ३-६ अशा फरकाने गमावल्यानंतर नदालने पुढील दोन सेट ६-३, ६-२ अशा फरकाने जिंकले.

फेलिक्सने चौथा सेट ६-३ अशा फरकाने जिंकला व २-२ अशी बरोबरी साधली. अखेरच्या सेटमध्ये नदालने झोकात पुनरागमन केले. हा सेट त्याने ६-३ अशा फरकाने जिंकला. नदालला या लढतीत प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी ४ तास व २१ मिनिटे लागली.

एकमेकांविरुद्धची कामगिरी

जोकोविच-नदाल यांच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या लढतींमध्ये चुरस पाहायला मिळाली आहे. दोघांमध्ये आतापर्यंत ५८ लढती झाल्या आहेत. जोकोविचने ३० लढतींमध्ये, तर नदालने २८ लढतींमध्ये विजय मिळवला आहे. या आकडेवारीवरून दोन खेळाडूंमधील संघर्ष प्रकर्षाने दिसून येतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()