French Open : इगा स्विअतेकचे तिसरे फ्रेंच विजेतेपद

Iga Swiatek claims third title | French Open
Iga Swiatek claims third title | French Open
Updated on

Iga Swiatek Claims Third Title French Open 2023 : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पोलंडच्या इगा स्विअतेकने चेक प्रजासत्ताकच्या कारोलिना मुचोवाचा ६-२, ५-७, ६-४ असा पराभव करून तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.

Iga Swiatek claims third title | French Open
Rohit Sharma WTC Final : रोहितने ओव्हलवर केलं मोठं रेकॉर्ड; तेंडुलकर अन् सेहवागच्या क्लबमध्ये दाखल

इगाने संपूर्ण स्पर्धेत एकही सेट गमावला नव्हता. दुसऱ्या सेटमध्ये तीन ४-१ अशा आघाडीवर होती; परंतु अचानक सामन्याला कलाटणी मिळू लागली आणि सलग चार गेम जिंकत मुचोवाने दुसरा सेट जिंकत सामन्यात रंग भरले. कसलेल्या इगाने वेळीच सावरले आणि तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये आपले प्रभुत्व सिद्ध केले. हे तिचे चौथे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. तीन फ्रेंच ओपन आणि एक युएस ओपन अशी अजिंक्यपदे तिने मिळवली आहेत.

या विजेतेपदासह इगाने मोनिका सेलेस आणि नाओमी ओसाका यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. ज्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत त्यांनी धडक मारली तेथे विजेते होऊनच त्यांनी सांगता केली.

Iga Swiatek claims third title | French Open
Women Junior Asia Cup 2023 : भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत

२२ वर्षीय इगा चार ग्रँडस्लॅम जिंकणारी सेरेना विल्यम्सनंतर पहिली लहान महिला खेळाडू ठरली. सेरेनाने १९९९ युएस, २००२ मध्ये फ्रेंच, विम्बल्डन आणि युएस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. तीन सेटच्या या लढतीत दुसऱ्या सेटमधील काही गेमचा अपवाद वगळता वर्चस्व राखणाऱ्या इगाने संपूर्ण सामन्यात अवघी एकच बिनतोड सर्व्हिस केली; परंतु तिचे सर्व्हिसवर चांगले नियंत्रण होते. या तुलनेत मुचोवाने सहा बिनतोड सर्व्हिस केल्या होत्या.

एकीकडे विजेत्या इगाचे कौतुक होत असताना उपविजेत्या मुचोवाच्याही लढतीचे कौतुक करण्यात येत होते. वारंवार झालेल्या दुखापतीमुळे तिला खेळण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली नव्हती; परंतु त्यानंतरही ती कोर्टवर उतरली. अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्याची जिगर दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.