French Open Womens Doubles Title: महिला दुहेरीचा अंतिम सामना फ्रान्समधील रोलँड गॅरोस येथे खेळवण्यात आला. या निर्णायक सामन्यात कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्टिना म्लादेनोविक या फ्रेंच जोडीने कोको गॉफ आणि जेसिका पेगुला या अमेरिकन जोडीचा पराभव केला. महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्टिना म्लादेनोविक या जोडीने 2-6, 6-3, 6-2 असा विजय मिळवला, आणि फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
गार्सिया आणि म्लदेनोविक यांची ही दुसरी महिला दुहेरी स्पर्धा आहे. या जोडीने 2016 मध्येही विजेतेपद पटकावले होते. आजचे जेतेपद त्यांचे या स्पर्धेतील दुसरे ग्रँडस्लॅम ठरले. गार्सिया आणि म्लदेनोविक ही जोडी एकत्रितपणे दुसरी स्पर्धा खेळत होत्या. यापूर्वी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये त्या एकत्र खेळल्या होत्या मात्र, त्यांचा पराभव झाला होता.
अमेरिकन खेळाडू १८वर्षीय कोको गॉफचा चोवीस तासात दुसऱ्या पराभव होता. काल झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिचा पराभव झाला होता. इगाला सुरुवातीपासूनच फ्रेंच खुली स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रमुख दावेदार मानले जाते. पहिल्या फेरीपासून वरचढ कामगिरी करत पाच पैकी चार सामने सरळ सेटमध्ये जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात गॉफ तिला झुंज देईल अपेक्षित होते पण १८ वर्षीय गॉफला दडपणामुळे अपयश आले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.