नवी दिल्ली- क्रिकेटच्या मैदानात कधी काय घडेल सांगता येत नाही. खेळाडूंना कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाते. तंत्रज्ञानाने हे काम सोपं केलं आहे. त्यामुळे क्वचित प्रसंगातच खेळाडूंना इजा होते. पण, एका खेळाडूनेच दुसऱ्याला इजा करण्याचं ठरवलं तर त्याला कोणी काही करु शकत नाही. असाच एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यात रनआऊट झालेल्या खेळाडूचा राग दुसऱ्या खेळाडूच्या जीवावर बेतल्याचं पाहायला मिळालं. (Frustrated Batter Hits Teammate With Bat After Getting Run Out viral video cricket news)
जगभरात क्रिकेटची क्रेझ निर्माण झाली आहे. टी-२० च्या आगमनाने तर चित्रच बदललं आहे. अनेक देश आता क्रिकेट खेळाला नव्याने शिकताना दिसत आहे. कॅनडा, यूएसए, यूएई असे देश क्रिकेटमध्ये मोठं काही करु पाहात आहेत. त्यादृष्टीने अनेक स्पर्धा आयोजन केले जात आहेत. खेळाडूंना अधिक पैसे खर्च करुन प्रशिक्षण दिलं जात आहे. पण, काही देशात अजून क्रिकेट प्राथमिक पातळीवरच असल्याचं दिसतंय. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये खेळाडूचा बेजबाबदारपणा दिसून आला.
हौशी खेळाडूंची क्रिकेट मॅच भरवण्यात आली होती. यात एक खेळाडू रनआऊट झाला. त्यामुळे मैदात सोडत असताना रागामध्ये त्याने बॅट फेकून दिली. बॅट फेकताना त्याने हात फिरवला होता, त्यामुळे ती बॅट थेट त्याचा सहकारी बॅट्समन खेळाडूला जाऊन लागली. यामुळे सहकाऱ्याला दुखापत झालीये. प्रतिस्पर्धी संघ हा सर्व प्रकार पाहून थक्क झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, आशियाई क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच आशिया कपचा थरार 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडिया 2023 च्या आशिया कपमध्ये 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.