टीम इंडियाच्या ताफ्यात लवकरच 'या' घातक बॉलर्सची होणार एन्ट्री

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोन गोलंदाज लवकरच टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे संकेत दिलेत.
sourav ganguly
sourav ganguly sakal
Updated on

आयपीएल सीझन 15 आता अंतिम टप्प्याच्या मार्गावर आहे. यंदाच्या या आयपीएल महाकुंभात अनेक युवा खेळडूंनी संधीचे सोनं करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोन गोलंदाज लवकरच टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

sourav ganguly
विराट कोहलीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुदर्शनचा...; आईचा खुलासा

आयपीएलनंतर टीम इंडियाला 10 दिवसांनंतर साऊथ अफ्रिकाविरुद्ध भारतातच 5 सामन्यांची टी 20 इंटरनॅशनल सीरीज खेळणार आहेत. भारत आणि अफ्रिकेमध्ये 9 जून ते 19 जून पर्यंतत टी 20 सीरीज खेळण्यात येणार आहे. अशातच सौरव गांगुली यांनी टीम इंडियाला दिलासादायक माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाले, असे किती गोलंदाज आहेत जे 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकतात? असे सवाल उपस्थित करत जर उमरान मलिकची निवड टीम इंडियासाठी झाली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.

उमरान मलिक सर्वात वेगवान आहे. आम्हाला त्याचा वापर खुप सावधगिरीने करावा लागणार आहे. असे सांगत ते म्हणाले, मला कुलदीप सेनदेखील पसंत आहे. यासोबत टी नटराजननेदेखील पुनरागमन केलं आहे.

तसेच, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हेदेखील टीम इंडियाच्या ताफ्यात असतीलच. मी आपल्या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीने खुप खूश आहे. आयपीएल 15 व्या सीझनमध्ये उमरान मलिकने 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे.

sourav ganguly
छा गए बापू! IPL इतिहासात अशी कामगिरी अक्षर पटेल चौथा गोलंदाज

अफ्रिकेविरुद्ध खेळल्यानंतर टीम इंडियाल ब्रिटन दौऱ्यावर जाणार आहे. 26 जून ते 28 पर्यंत आयरलँडविरुद्ध दोन मॅचची टी 20 सीरीज खेळणार आहेत. टीम इंडिया जुलैमध्ये इंग्लडविरुद्ध 1 टेस्ट, 3 वनडे आणि 3 टी 20 मॅच खेळणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे रद्द झालेली पाचवी कसोटी पूर्ण करण्यासाठी भारत ही एकमेव कसोटी खेळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()