Six Wickets In Over : ऑस्ट्रेलियात गोलंदाजाचा भीमपराक्रम! एकाच ओव्हरमध्ये सहा विकेट घेत खेचून आणला विजय

गोलंदाजाने डावाच्या शेवटच्या षटकात 6 चेंडूत 6 विकेट्स घेत खळबळ उडवून दिली आहे.
Six Wickets In Over
Six Wickets In Over
Updated on

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, देशांतर्गत क्रिकेट आणि क्लब क्रिकेटमध्ये अनेकदा फलंदाजांनी 6 चेंडूत 6 षटकार मारले आहेत. परंतु एका षटकात 6 चेंडूत 6 विकेट्स घेतल्याचे कधीतरीच पाहायला मिळते. मात्र, आता असा प्रकार ऑस्ट्रेलियात पाहायला मिळाला आहे.

येथे एका गोलंदाजाने डावाच्या शेवटच्या षटकात 6 चेंडूत 6 विकेट्स घेत खळबळ उडवून दिली आहे. त्याने संघाला विजयही मिळवून दिला. गॅरेथ मॉर्गन असे या गोलंदाजाचे नाव असून त्याने एका षटकात सर्व चेंडूंवर विकेट्स घेत क्लब क्रिकेटमध्ये कमाल केली आहे.

थर्ड डिव्हिजन क्लब क्रिकेटमध्ये गॅरेथ मॉर्गन नावाच्या गोलंदाजाने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सलग 6 चेंडूत 6 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. क्लब क्रिकेटमध्ये असे दुसऱ्यांदा घडले असून आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियातच हा प्रकार पाहायला मिळाला आहे.

याआधी जानेवारी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन क्लब क्रिकेटमध्ये अॅलेड कॅरीने एका षटकात 6 बळी घेतले होते. अशा तऱ्हेने सलग 6 विकेट्स घेणारा गॅरेथ दुसरा गोलंदाज आहे. विशेष म्हणजे विरोधी संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी अवघ्या 5 धावा हव्या होत्या. मात्र गॅरेथ यांने सहा विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला.

Six Wickets In Over
Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास! सचिन-सेहवागनंतर 'ही' कामगिरी करणार तिसरा भारतीय सलामीवीर

मुदगिराबा नेरंग अँड डिस्ट्रिक्ट्स सीसी थर्ड ग्रेड कर्णधार गॅरेथ मॉर्गनने शनिवारी गोल्ड कोस्ट येथे सर्फर्स पॅराडाईज सीसीसंघावर चार धावांनी विजय मिळवला. त्यांनी अखेरच्या षटकात सहा गडी बाद करून क्रिकेटमध्ये चमत्कार केला.

सर्फर्स पॅराडाईजला शेवटच्या षटकात विजयासाठी पाच धावांची गरज होती आणि संघाच्या हातात सहा गडी शिल्लक होते. मॉर्गनने उर्वरित सर्व फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यातील पाच खेळाडू गोल्डन डकचे बळी ठरले. मॉर्गनच्या षटकात पहिले चार फलंदाज कॅच आऊट झाले, तर उर्वरित दोन फलंदाज बोल्ड झाले.

Six Wickets In Over
Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास! सचिन-सेहवागनंतर 'ही' कामगिरी करणार तिसरा भारतीय सलामीवीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.