Gautam Gambhir: गौतम गंभीर लवकरच भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी;सल्लागार समितीकडून मुलाखतीचा पहिला टप्पा पार

Gautam Gambhir India's head coach: माजी सलामी फलंदाज व कोलकाता नाईट रायडर्स संघाला यंदाच्या मोसमात आयपीएलचे जेतेपद मिळवून देणारा गौतम गंभीर हा लवकरच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत होणार आहे.
Gautam Gambhir
Gautam Gambhirsakal
Updated on

नवी दिल्ली : माजी सलामी फलंदाज व कोलकाता नाईट रायडर्स संघाला यंदाच्या मोसमात आयपीएलचे जेतेपद मिळवून देणारा गौतम गंभीर हा लवकरच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत होणार आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीकडून गंभीरची मुलाखत मंगळवारी घेण्यात आली. मुलाखतीचा पहिला टप्पा पार पडला असून आता उद्या (ता. १९) आणखी एक मुलाखतीची फेरी होणार आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. येत्या ४८ तासांमध्ये याबाबतची घोषणा होऊ शकते.

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीच्या चेअरमनपदी अशोक मल्होत्रा आहेत. अशोक मल्होत्रा यांनी झूम ॲपवर गौतम गंभीरची मुलाखत घेतली. मुलाखतीचा आणखी एक टप्पा उद्या होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली. मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीरचाच अर्ज आला होता. त्यामुळे त्याची निवड अपेक्षित आहे. झूम ॲपवर घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान सल्लागार समितीतील जतीन परांजपे व सुलक्षणा नाईक हे सदस्य उपस्थित नव्हते. यावेळी सल्लागार समितीकडून निवड समितीतील उत्तर विभागासाठी रिक्त असलेल्या पदासाठीही मुलाखती घेण्यात येणार आहेत.

आयसीसीच्या तीन स्पर्धांकडे लक्ष

अशोक मल्होत्रा व गौतम गंभीर यांच्यामध्ये झालेल्या संवादात पुढील तीन वर्षांचा रोडमॅप यावर चर्चा करण्यात आली. पुढील तीन वर्षांमध्ये आयसीसीच्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये चॅम्पियन्स करंडक, टी-२० विश्‍वकरंडक व एकदिवसीय विश्‍वकरंडक यांचा समावेश आहे, तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही याचदरम्यान होणार आहे. गंभीरच्या योजनांवर यावेळी लक्ष देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.